संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 03:30 PM2019-07-16T15:30:03+5:302019-07-16T15:30:10+5:30

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

Sowing might be fail in Sangrampur taluka due to lack of rain | संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

संग्रामपूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

Next

- अजहर अली 
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील शेतकय्रांवर संकटाची मालिका सुरूच आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या बळीराजा वर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
गत दहा ते बारा दिवसापासून वरून राजा रुसून बसल्याने हजारो हेक्टरवरील पेरण्या करपण्याची दाट शक्यता आहे. सद्यास्थिती पेरणी झालेली पिके उगवली असुन तापमाणात वाढ झाल्याने सोपटत आहेत. पिकांना पाणि न मिळाल्यास उगवलेली पिके करपतील या मुळे येथिल शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गंभिर स्वरूपाच्या दुष्काळाने आर्थिक संकटात सापडलेल्या दुष्काळ ग्रस्त शेतकय्रांसाठी पावसाने दडी मारल्याने दुष्काळात तेरावा महीना उगवला. संग्रामपूर तालुक्यातील ४४ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावर दर वर्षी खरीप पिकींची लागवड करण्यात येते.
सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहु लागले. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यावर्षी पावसाळा चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले होते.
शेतकºयांनी शेतीत विविध पिकांची लागवड केली. तालुक्यात एकुण ३६ हजार ४६० हेक्टरवरील क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये ३११ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली. मका ८८२ हेक्टर, तुर १ हजार ६५९ हेक्टर, मुग ६८३ हेक्टर, उडीद ५५९ हेक्टर, सोयाबिन ११ हजार ७३०, तर कपाशी पिकाची २० हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असुन सर्व पिके पाण्याअभावी धोक्यात आली असल्याचे विदारक चित्र आहे. गत पाच वर्षापासून संग्रामपुर तालुक्यात निर्सगाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचे मोठ्यीप्रमाणात नुकसान होत असल्याने शेती घाट्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांची आर्थीक कोंडी झालेली दिसून येते. खरिप हंगामात बँकांनी पिक कर्ज व कर्जाचे पुर्नगठन करण्यास नकार घंटा दिल्याने शेतकºयांनी सावकारांचे उंबरठे झिजवत कर्ज काढुन हंगामी पिकांची पेरणी केली.
परंतु पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात पावसाचे लवकर आगमन न झाल्यास हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे बळीराजा व्यथीत झाला आहे.

Web Title: Sowing might be fail in Sangrampur taluka due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.