अल्प पावसाचा बुलडाणा जिल्ह्यातील शेततळ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 06:10 PM2018-07-29T18:10:13+5:302018-07-29T18:11:43+5:30

बुलडाणा : पावसाळा सुरू होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अल्प पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प, नदी, नाल्यासह काही तालुक्यात शेतकºयांनी घेतलेल्या शेततळ्यातही कमी जलसाठा दिसून येत आहे.

Sowing of small rains in Buldhana district | अल्प पावसाचा बुलडाणा जिल्ह्यातील शेततळ्यांना फटका

अल्प पावसाचा बुलडाणा जिल्ह्यातील शेततळ्यांना फटका

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात ४ हजार ६४८ शेततळे तयार करण्यात आले आहेत. यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेततळेही तहानलेले आहेत.

 हर्षनंदन वाघ

बुलडाणा : पावसाळा सुरू होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही अल्प पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प, नदी, नाल्यासह काही तालुक्यात शेतकºयांनी घेतलेल्या शेततळ्यातही कमी जलसाठा दिसून येत आहे. पावसाचा खंड पडल्यास, खरीप हंगामात शेवटी तसेच रब्बी हंगामाची अपेक्षा असलेला शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. पावसाळा सुरू होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला असून वार्षिक सरासरीच्या ६७.५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प, नदी व नाले कोरडे असून त्याचा खरीपासह रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अल्प पावसामुळे निर्माण होणारी दुष्काळाची समस्या काही प्रमाणात दूर करून सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यात ४ हजार ६४८ शेततळे तयार करण्यात आले आहेत. मात्र यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात शेततळेही तहानलेले दिसून येत असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आणि राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे आणि त्यातून संरक्षित व शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शेततळी हा उपयुक्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेततळ्यामुळे शेतकºयांना खरीप हंगामात पावसाच्या खंडीत कालावधीत फायदा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील सर्वात मोठे शेततळे ३० बाय ३० बाय ३ मीटर तर सर्वात लहान शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय ३ मीटर असे आकारमान निश्चित करण्यात आले आहे. सर्वात मोठ्या शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ५० हजार रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे तर इतर शेततळ्यासाठी त्यांच्या आकारमानानुसार अनुदान देण्यात येते. अनुदानाशिवाय जास्तीचा खर्च शेतकºयाला करावा लागणार असून शेतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येते. या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण ५ हजार शेततळ्यांचे लक्षांक ठेवण्यात आले होते. यासाठी आलेल्या १२ हजार ९५६ अर्जातून ६ हजार ९९५ अर्जदार शेतकºयांना शेततळे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यापैकी ६ हजार ९७४ शेतकºयांना शेततळ्याची आखणी करून देण्यात आली. मात्र त्यौपैकी ४ हजार ६४८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

खामगाव उपविभागात सर्वाधिक शेततळे

जिल्ह्यात सर्वात जास्त खामगाव उपविभागात १ हजार ९१८ शेततळे आहेत. तयात खामगाव तालुक्यात ६५५, शेगाव तालुक्यात २४०, नांदूरा तालुक्यात १९५, जळगाव जामोद तालुक्यात ४३२, संग्रामपूर तालुक्यात ३९६ शेततळे आहेत. बुलडाणा उपविभागात १ हजार ८४ शेततळे आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यात १९५, चिखली तालुक्यात ३४५, मोताळा तालुक्यात ३०१ व मलकापूर तालुक्यात २४३ शेततळे आहेत. तसेच मेहकर उपविभागातील मेहकर तालुक्यात २५८, लोणार तालुक्यात २६३, देऊळगाव राजा तालुक्यात ३३५ व सिंदखेड राजा तालुक्यात ७९० शेततळे घेण्यात आली आहेत.

मेहकर उपविभागातील शेततळ्यांना फायदा

जिल्ह्यातील मेहकर उपविभागात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या परिसरातील शेततळ्यांना फायदा झाला आहे. त्याप्रमाणात बुलडाणा उपविभाग व खामगाव उपविभागातील काही तालुक्यात शेततळ्यात अल्प पाणीसाठा आहे.

Web Title: Sowing of small rains in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.