दुसरबीड परिसरात खाेळंबलेल्या पेरण्यांना गती मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:17+5:302021-06-29T04:23:17+5:30
हवामान खात्याने सुरुवातीलाच चांगला पाऊस हाेईल, असा अंदाज वर्तवला हाेता़ त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसावरच साेयाबीन व इतर पिकांची ...
हवामान खात्याने सुरुवातीलाच चांगला पाऊस हाेईल, असा अंदाज वर्तवला हाेता़ त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसावरच साेयाबीन व इतर पिकांची पेरणी केली़ त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे़ बियाणांचे वाढलेले भाव व निर्माण झालेला बियाणांचा तुटवडा या परिस्थितीवर मात करत पुन्हा पेरणीस सुरुवात केली आहे़ पावसाने दिलेल्या उघडीपमुळे शेतकऱ्यांनी पेरणी बंद केली हाेती़ रविवारी झालेल्या पावसामुळे पेरण्यांना गती मिळणार आहे़ सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने शेती मशागतीची कामे रखडली हाेती़ या पावसामुळे अनेकांना आता आपल्या शेतीची रखडलेली कामे पूर्ण करता येणार आहेत़ परिसरात सोयाबीन,कपाशी, मूग ,उडीद आदी पिकांची माेठ्या प्रमाणात पेरणी केली जाते़ सोयाबीन बियाणे १२० ते १३० रुपये किलोप्रमाणे घ्यावे लागत आहे़ दुबार पेरणीचे संकट आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे़