सोयाबीनवर खोडमाशी, उंटअळी, चक्रीभुंग्याचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:31 AM2017-09-28T01:31:22+5:302017-09-28T01:31:22+5:30
बुलडाणा : मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळी यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळी यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे.
कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २0१७-१८ अंतर्ग त मोताळा व मलकापूर तालुक्यातील प्रादुर्भावग्रस्त पिकांची प्र त्यक्षात शेतात जावून पाहणी केली. या चमूमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सी.पी. जायभाये, डॉ. मिलिंद गिरी, कीड नियंत्रक जी. टी सांगळे, मंडळ कृषी अधिकारी के. एल कंकाळ, एस.एच पवार, कृषी पर्यवेक्षक व्ही. आर. धांडे, विशाल महाजन, डी. बी. नवले, कीड सर्वेक्षक विकास ताठे, मयूर मेहसरे यांचा समावेश होता.
शेतकर्यांनी बांधावरील किडींना पूरक असणार्या वनस्पतींचा नाश करावा, अंडपुंज असलेली पाने नष्ट करावी. पाच ते दहा कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावे, सोयाबीनवरील शेंगा पोखरणार्या अळीच्या नियंत्रणासाठी एन्डॉक्झकार्ब १५.६ ई.सी ७ मि.ली किंवा क्लारन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मि.ली किंवा लॅमडा सॅहलोथ्रीन ४.९ सि.एस ६ मि.ली १0 लीटर पाण्या त फवारावे, कापूस पिकावर सीटामाप्रीड २0 एस.पी २.५ ग्रॅम, थायमिथॉक्साम २५ डब्ल्यू जि २.५ ग्रॅम, डायमेथोएट ३0 इ.सी १0 मि.ली यापैकी एका औषधाची १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनी नियमित पिकांची पाहणी करून एकात्मिक कीड नियंत्रणाचा मार्ग अवलंबवावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.