सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:35 AM2017-09-04T00:35:20+5:302017-09-04T00:35:48+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच सोयाबीनवर ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’ या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्पोडोप्टेराच्या विळख्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. जिल्ह्यात एकूण पिकाच्या ५0 टक्के क्षेत्रावर सोयाबीन आहे. 

Soya bean crop is infested! | सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव!

सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव!

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी संकटात उत्पादन घटण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच सोयाबीनवर ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’ या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्पोडोप्टेराच्या विळख्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. जिल्ह्यात एकूण पिकाच्या ५0 टक्के क्षेत्रावर सोयाबीन आहे. 
 खरिपाच्या एकूण पिकापैकी सोयाबीन पीक हे सर्वाधिक असते. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा उदरनिर्वाहच सोयाबीन पिकाच्या भरवशावर आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने सोयाबीनची पेरणी वेळेवर झाली. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन पीक चांगले बहरलेले असून, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत; परंतु सोयाबीनवर ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’ या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीला शास्त्रीय भाषेत ‘स्पोडोप्टेरा लिटुरा’, असे म्हटले जाते. बहुजातीय पिकाचे नुकसान करणार्‍या या किडीचा सोयाबीन पिकावर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी प्रादुर्भाव जास्त आढळतो. मळकट पांढरट हिरवी व थोडीशी पारदर्शक दिसणारी ही कीड सध्या सोयाबीन पिकावर मोठय़ा प्रमाणावर दिसत आहे. या अळीच्या शरीरावर   पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असून, या अळीची मादी पतंग पानांवर पुंजक्यात ३00 ते ४00 अंडी घालते. ३ ते ४ दिवसांत अंड्यातून निघालेल्या या अळ्या सामूहिकपणे पानांचा हिरवा भाग खातात.     त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होऊन उत्पादनातही घट होते. 

शेतकर्‍यांना मार्गदर्शनाची गरज
जऊळका : परिसरातील सोयाबीनवर पाने खाणार्‍या अळीने व शेंड अळीने मोठय़ा प्रमाणात आक्रमण केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाने पिकाच्या पानावर स्पोडोप्टेरा व खोडामध्ये चक्रीभुंगा या अळीने शिरकाव केला. या अळीसाठी कोणती औषधे वापरावी, याचे ज्ञान शेतकर्‍यांना नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जऊळका या परिसरात सोयाबीनचा पेरा जास्त असल्याने शेतकरी वर्गाची भिस्त सोयाबीनवरच अवलंबून आहे. सोयाबीवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा याने केलेल्या आक्रमणामुळे शेतकरी कामलीचे अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाचा एकही कर्मचारी औषध फवारणीचे व इतर मार्गदर्शन करण्यासाठी आजपर्यंत गावात आलेला नाही. त्यामुळे जऊळका, पिंपळगाव कुंडा, लिंगा या ठिकाणी औषध फवारणीचे मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.  

Web Title: Soya bean crop is infested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.