सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात!

By Admin | Published: October 23, 2016 02:04 AM2016-10-23T02:04:09+5:302016-10-23T02:04:09+5:30

सोयाबीन पिकाचा ताळेबंद तोट्यात आला असून, एकरी तीन हजारांचा फटका.

Soya bean growers dark in Diwali! | सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात!

सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात!

googlenewsNext

ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. २२-जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन यावर्षी एकरी चार ते पाच क्विंटल झाले असून, त्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादनासाठी लागलेला खर्च भरून निघणेही अवघड झाले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
सोयाबीन उत्पादनासाठी एकरी १५ हजार ६00 रुपये खर्च येत असून, उत्पन्न मात्र सरासरी १२ हजार ५00 रुपयां पर्यंतच मिळत आहे. यावर्षी सोयाबीन पिकाचा ताळेबंद तोट्यात आहे. सोयाबीन पेरणीपासून केलेल्या परिश्रमाचे फळ शेतकर्‍यांना सोयाबीन कापणीनंतरच मिळते; परंतु सोयाबीन पेरणी ते सोयाबीन काढणीच्या हंगामापर्यंंत शे तकर्‍यांना परिश्रमाबरोबरच आर्थिकतेची जोडही मोठय़ा प्रमाणात करावी लागते. जिल्ह्यातील पांढरे सोने (कापूस) हद्दपार होऊन आता सोयाबीनचा भाग म्हणून जिल्ह्याला ओळखले जात आहे. शेतकर्‍यांनी गत १0 वर्षांपासून सोयाबीन पिकाला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीचे ७ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन तीन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आहे. यावर्षी सोयाबीन पेरणीच्यावेळी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीन चांगले बहरले होते. मात्र शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला फटका बसला. त्यानंतर सोयाबीन काढणीच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन िपकाचे नुकसान केले. यामुळे सोयाबीन उत्पादनात घट होऊन यावर्षी एकरी सरासरी चार ते पाच क्विंटल सोयाबीन उत्पादन झाले. बाजारामध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल २ हजार ५00 रुपयांपर्यंंतच भाव मिळत आहे. त्यामुळे एका एकरामध्ये पाच क्विंटल सोयाबीन झाल्यास शेतकर्‍यांना सरासरी १२ हजार ५00 रुपये मिळत आहेत; परंतु सोयाबीन उत्पादनासाठी शेतकर्‍यांना पूर्व मशागत, पेरणी खर्च, बियाणे व खत खर्च, आंतर मशागत खर्च, पीक फवारणी, काढणी, वाहतूक असा एकूण खर्च १५ हजार ६00 रुपयांपर्यंंत जात आहे. त्यामुळे एकराला १२ हजार ५00 रु पयांचे उत्पन्न व १५ हजार ६00 रुपये खर्च लागत असल्याने शेतकर्‍यांना एकरी सरासरी ३ हजार १00 रुपयांचा फटका बसत आहे. सोयाबीन उत्पादनासाठी लागणारा खर्च हा शेतकर्‍यांच्या हाती येणार्‍या मिळकतीपेक्षा अधिक होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

सोयाबीनला हमीभावही मिळेना!
शासनकडून सोयाबीन पिकासाठी २ हजार ७७५ रुपये हमीभाव ठरून देण्यात आला आहे; परंतु शासनाकडून ठरून देण्यात आलेला हमीभावही व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. ओल्या सायोबीनला १७00 ते २000 रुपये व वाळलेल्या सोयाबीनला २ हजार ते २ हजार ५00 रुपयांपर्यंंतच भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अत्यल्प भाव असूनही सण उत्सवामुळे अनेक शेतकर्‍यांना सोयाबीन विक्रीस काढावे लागत आहे.

काळवंडलेल्या सोयाबीनकडे व्यापार्‍यांची पाठ
सोयाबीन सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन काळवंडले; परंतु काळवंडलेले सोयाबीन खरेदी करण्याकडे व्यापारी पाठ फिरवत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बाजार समितीमध्ये अनेक शेतकरी सोयाबीन विक्री करण्यापूर्वी सोयाबीन वाळू घालत आहेत; परंतु व्यापार्‍यांकडून अशा सोयाबीनकडे पाहिल्या जात नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

सोयाबीनचा एकरी ताळेबंद
पूर्व मशागत व पेरणी खर्च-      २१00  
बियाणे व खत खर्च -              ३५00
आंतर मशागत खर्च -              ४५00
पीक फवारणी खर्च -              २000
काढणी खर्च -                        २५00
वाहतूक खर्च -                       १000
एकरी एकूण खर्च -               १५६00
एकरी उत्पन्न -         ५ क्विं.
मिळणारा भाव -                    २५00
एकरी उत्पादन रुपये  -         १२५00
झालेला तोटा -                      ३१00

बाजार समितीमध्ये दिवसाकाठी १५ क्विंटलच्या जवळपास सोयाबीन येत आहे; परंतु यामध्ये ओले व काळवंडलेले सोयाबीन राहत असल्याने त्या सोयाबीनला जास्त भाव मिळत नाही.
- वनिता साबळे,
सचिव,
कृउबास, बुलडाणा.

Web Title: Soya bean growers dark in Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.