सोयाबीनची आवक सात पटीने घटली!
By admin | Published: October 30, 2014 11:03 PM2014-10-30T23:03:50+5:302014-10-30T23:32:33+5:30
शेतमालाअभावी खामगाव बाजार समिती पडली ओस
नाना हिवराळे / खामगाव
यावर्षीच्या खरीप हंगामात निसर्ग शेतकर्यावर कोपला असून, पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणार्या उलाढालीवर झाला आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात अडीच लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक होती; मात्र यंदा केवळ ४0 हजार क्विंटलची आवक असल्याने सोयाबीनची आवक सात पटीने कमी झाल्याचे दिसून आले आहे.
पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरलेच नाही. ज्वारीसारख्या सोयाबीनचा दाणा राहिल्याने उत् पादनात प्रचंड घट झाली आहे. यावर्षी चांगल्या प्रतीच्या जमिनीत एक ते दोन पोते तर काहींना ४0 ते ५0 किलो उत् पादन होत आहे. यामुळे बर्याच शेतकर्यांनी शेतातून सोयाबीन काढण्यासही उत्साह दाखविला नाही.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान केवळ ४0 हजार क्विंटल सोयाबीन विक्रीला आणले आहे. सध्या २४५0 ते ३२५0 रुपये प्रतिक्विंटल भाव सुरु आहे. तर गतवर्षी याच कालावधीत अडीच लाख िक्वंटल सोयाबीनची आवक होती. गेल्या २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान सहा दिवस बाजार समिती बंद असतानाही सात हजार क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक आली नाही. गत तीन दिवसांपासून पाच ते सहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. गतवर्षी याच दिवशी २0 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती व २३00 ते ३७२५ रुपये प्रति िक्वंटल भाव मिळाला होता; मात्र यावर्षी चित्र उलटे झाले आहे.