पैनगंगातील प्रदूषण रोखण्यासाठी सरसावले ‘सोयरे’!

By admin | Published: September 14, 2016 01:01 AM2016-09-14T01:01:36+5:302016-09-14T01:01:36+5:30

बुलडाणा येथील वन्य जीव सोयरे या संघटनेने पुढाकार घेतला आहे.

'Soyare' to prevent pollution in Panganga! | पैनगंगातील प्रदूषण रोखण्यासाठी सरसावले ‘सोयरे’!

पैनगंगातील प्रदूषण रोखण्यासाठी सरसावले ‘सोयरे’!

Next

बुलडाणा, दि. १३: अजिंठय़ाच्या डोंगर रांगेत उगम पावलेल्या पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी वन्य जीव सोयरे या संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी नदीपात्राजवळील एका पुलाजवळ तात् पुरते निर्माल्य गोळा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जिल्हय़ातून जाणार्‍या पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या नावाने नावारूपास आलेल्या पैनगंगा अभयारण्यातील वन्य जीवांना या प्रदूषणाने होत असलेले धोके लक्षात घेऊन साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीलगत असलेल्या पुलाजवळ निर्माल्य वस्तू एकत्र जमा करून नदीची प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी वन्य जीव सोयरे बुलडाणा यांच्यामार्फत पुलाजवळ तात्पुरते निर्माल्य कुंड १३ सप्टेंबर रोजी तयार करण्यात आले आहे. येत्या काळात गणपती विसर्जन, नवरात्रात देवीचे विसर्जन होणार आहे. विसर्जनाच्या वेळी आपले अनेक सोयरे हार, फूल, दूर्वा, प्रसाद, अगरबत्ती, बेलाची पाने, कर्दळीची पाने, नारळ, कापूर इ. विसर्जित करतात. या साहित्याच्या विसर्जनाने पैनगंगा नदीचे प्रदूषण वाढत आहे.
या निर्माल्य वस्तू भाविकांनी वन्य जीव सोयर्‍यांनी तयार केलेल्या निर्माल्य कुंडामध्ये टाकून सहकार्य करावे, असे आवाहन वन्य जीव सोयरे यांनी केले आहे.

घोषवाक्याद्वारे आवाहन
भाऊ, दादा अन् काका पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखा, निर्माल्य येथेच टाका, असे घोषवाक्य तयार केले आहे. दरम्यान, वन्य जीव सोयर्‍यांच्या निर्माल्य कुंडाला माजी आ.विजयराज शिंदे यांनी अचानक भेट दिली व लोकांनी पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी वन्य जीव सोयर्‍यांनी तयार केलेल्या निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य टाकून सहकार्य करावे, असे आवाहन भक्तांना केले.

यांनी घेतला पुढाकार
वन्य जीव सोयरे निर्माल्य कुंड तयार करण्यासाठी गणेश ङ्म्रीवास्तव, गणेश झगरे, गणेश वानखेडे, प्रशांत आढे, सुरज वाडेकर, अमोल रिंढे, संजय मोटे, मनोज तायडे, मोरे, सुरेश दांडगे, संतोष कंकाळ, नितीन ङ्म्रीवास्तव या सोयर्‍यांनी ङ्म्रमदान करून निर्माल्य कुंड तयार केले.

Web Title: 'Soyare' to prevent pollution in Panganga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.