फोडणी महागली : साेयाबीन तेलाचे भाव १५० रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:42+5:302021-04-13T04:32:42+5:30
गेल्या वर्षापासून कोरोना संसर्ग आजारामुळे देशावर आर्थिक संकट आले हाेते. अनेक कामगारांचे रोजगार गेले तर कित्येक नागरिकांचे संसार ...
गेल्या वर्षापासून कोरोना संसर्ग आजारामुळे देशावर आर्थिक संकट आले हाेते. अनेक कामगारांचे रोजगार गेले तर कित्येक नागरिकांचे संसार उघड्यावर आले. खाद्यतेल हे जीवनावश्यक असून गेल्या काही दिवसापासून खाद्य तेलाचे भाव झपाट्याने वाढत असून सोयाबीन तेलाचे भाव जवळपास १५० रुपये किलोवर पाेहोचले आहे. शेंगदाणे तेल, सूर्यफूल तेलाचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. तेलाच्या भाववाढीमुळे सर्व खाद्यपदार्थांचे भाव वाढत असल्याने गोरगरीब जनता मेटाकुटीस आली आहे. एप्रिल-मे महिन्यात सणासुदीचे दिवस असून लग्नसमारंभसुद्धा याच हंगामात असल्याने व तेलाचे भाव गगनाला भिडले असले आहेत. जीवनावश्यक असल्याने कितीही महाग झाले तरी घ्यावेच लागते. ग्रामीण भागातील दिवाबत्ती करण्याकरिता लागणारे राॅकेल बंद केल्यामुळे विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला तर खाद्यतेलाचे दिवे घरात लावावे लागत आहेत. त्यामुळे तेलाचा वापर करावाच लागतो. खाद्यतेलाच्या भावावर सरकारने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.