३० गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:44+5:302021-04-07T04:35:44+5:30

जि‍ल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती आराखडा सन २०२०-२०२१ मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेडराजा, चिखली, बुलडाणा, देऊळगावराजा, लोणार व ...

Special amendment of plumbing schemes approved for 30 villages | ३० गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजुर

३० गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजुर

Next

जि‍ल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती आराखडा सन २०२०-२०२१ मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेडराजा, चिखली, बुलडाणा, देऊळगावराजा, लोणार व मेहकर तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ योजना व नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर, कोनड खु., धोत्रा नाईक, अमोना, रोहडा, गुंजाळा, अंचरवाडी, काटोडा, एकलारा, किन्ही नाईक, सावरगाव डुकरे, खैरव, भालगाव या गावांमध्ये पाणीटंचाई नि‍वारणार्थ नळ योजनेची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरखेड, दत्तापूर, लिंगा येथे नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. लोणार तालुक्यातील धायफळ, जाफ्राबाद, पार्डा दराडे, टिटवी, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही, गिरोली खु., बोराखेडी बावरा, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी, अंभोडा, तराडखेड, मेहकर तालुक्यातील खानापूर, घाटबोरी, दादुलगव्हाण व गणपूर गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे देऊळगावराजा तालुक्यातील सेवानगर, सिंदखेडराजा तालुक्यातील बुट्टा, चिखली तालुक्यातील पिंपरखेड, कारखेड, हराळखेड, गांगलगाव, मेहकर तालुक्यातील लोणी लव्हाळा, बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड गावामध्ये तात्पुरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. मंजूर तात्पुरत्या पूरक नळ योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ही तात्पुरती पूरक नळ योजना किमान तीन वर्षांसाठी कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणीटंचाई विभागाने दिली आहे.

Web Title: Special amendment of plumbing schemes approved for 30 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.