खामगाव तालुक्यात गौण खनिज चोरीविरुद्ध विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:54 AM2018-02-14T00:54:48+5:302018-02-14T00:56:33+5:30
खामगाव: विना परवाना गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करताना वाहन आढळल्यास त्याच्यावर वाहनाच्या स्वरूपावरून दंडाची वसुली केल्या जाणार असून, दंडाची रक्कमही १ ते ७ लाखापर्यंत असणार आहे, अशी माहिती तहसीलदार सुनील पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

या निर्णयामुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रशासनाने या निर्णयाची ३ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. नुकतेच जळगाव जिल्हय़ा तील वरणगाव येथून रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्या चार मोठय़ा ट्रकांना पोलिसांनी पाठलाग करून खामगाव येथे पकडले. सदर वाहनांवर खामगाव महसूल विभागाने नवीन तरतुदीनुसार दंड प्रस्तावित केला आहे. तसेच मागील पाच दिवसात पकडलेल्या सहा वाहनांवरसुद्धा नवीन तर तुदीनुसार दंड आकारण्यात आला आहे.
दंडाची रक्कम लाखात असल्याने काही वाहनधारकांनी त्यांची वाहने सोडविण्यासाठी असर्मथता दर्शविल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तसेच रेती घाट धारकांकडून मिळणार्या रॉयल्टी पासवर आता तासाचा कालावधी नमूद राहणार असून, एकाच रॉयल्टी पासवर होणार्या जादा अवैध वाहतुकीलाही चाप बसणार आहे.
अशी आहे वाहनानुसार दंडाची कारवाई
नवीन दंडाच्या तरतुदीत ड्रिल मशीनकरिता २५ हजार, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रॅक्टरसाठी १ लाख रुपये, फुल बॉडी ट्रक, टिप्पर २ लाख रुपये, ड्रॉलर बार्ज, मोटररॉइज्ड बोट ५ लाख रुपये, एक्स कॅबेटर, मॅकेनाइज्ड लोडर ७ लाख ५0 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
गौण खनिजाचे भाव वधारले
नवीन तरतुदीनुसार दंडाची रक्कम तसेच रॉयल्टी पासवर वेळेचा कालावधी नमूद केल्याने गौण खनिज वाहतुकदारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे गौण खनिज व्यवसायिकांनी गौण खनिजांचे भाव वाढवल्याचे समजते. अगोदर दोन ते अडीच हजाराला १ ब्रास मिळणारी रेती आता चार ते साडेचार हजाराला मिळत आहे.