बुलडाणा: ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 03:16 PM2020-02-12T15:16:30+5:302020-02-12T15:16:36+5:30

जिल्ह्यात तीन लाख ६० हजार शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र त्यापैकी ५९ हजार शेतकºयांना पीक कर्ज मिळालेले नाही.

Special campaign for crop loan of 59 thousand farmers in Buldhana district | बुलडाणा: ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

बुलडाणा: ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पीक कर्ज न मिळालेल्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या वित्तीय विभागाकडून याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात तीन लाख ६० हजार शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र त्यापैकी ५९ हजार शेतकºयांना पीक कर्ज मिळालेले नाही. त्यादृष्टीकोनातून ही मोहिम राबविण्यात येत आहे.
याबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी एक पत्रच निर्गमीत केले असून आगामी १५ दिवसांच्या काळात ग्रामपातळीवर विशेष मोहिम राबविण्याबाबत निर्देशीत केले आहे. ही मोहिम राबविण्यासाठी शेतकºयांना संबंधीत गावातील महसुली व कृषी यंत्रणेने सहकार्य करण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी सुचीत केले आहे.
पीक कर्ज वाटपाचा टक्का अलिकडील काळात घसला आहे. २०१७-१८ मध्ये तो अवघा २६.१३ टक्क्यांच्या आसपास होता. त्या पार्श्वभूमीवर किसान क्रेडीट कार्ड धारक असलेल्या परंतू बँकांपर्यंत न पोहोचलेल्या किंवा पीक कर्ज उपलब्ध होऊन शकलेल्या शेतकºयांसाठी ही व्यापकस्तरावर मोहिम राबविण्यात येत आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसारच ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेतील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ८७७ कोटी रुपयांचे खरीप व रब्बी पीक कर्जाचे उदिष्ठ २०१८-१९ मध्ये होते. मात्र प्रत्यक्षात ६१० कोटी ६३ लाख ३८ हजार रुपयेच अर्थात ३२.५३ टक्केच आहे. त्या पार्श्वभूमीवरशेतकºयांची आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठी ही मोहिम सहाय्यभूत ठरावी.

तीन लाख रुपयापर्यंत मिळणार कर्ज
किसान क्रेडीट कार्ड असलेल्या परंतू बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध न झालेल्या शेतकºयांना तीन लाख रुपये मर्यादेत पीक कर्ज उपलब्ध केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठलीहे बँक प्रोसेसिंग चार्जेस तथा निरीक्षण चार्जेस लागणार नसल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच यासाठी ग्रामपातळीवर ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांची मदत घेण्यात येत आहे.

Web Title: Special campaign for crop loan of 59 thousand farmers in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.