बुलडाणा जिल्ह्यातील ८ पोलिसांना विशेष सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 03:57 PM2020-01-24T15:57:30+5:302020-01-24T15:57:36+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Special Service Medal for 8 Police in Buldana District | बुलडाणा जिल्ह्यातील ८ पोलिसांना विशेष सेवा पदक

बुलडाणा जिल्ह्यातील ८ पोलिसांना विशेष सेवा पदक

googlenewsNext

- सोहम घाडगे  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सतत दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळ खडतर सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील आठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची यावर्षीच्या विशेष सेवा पदकासाठी निवड झाली आहे. जीवाची बाजी लावून नक्षलग्रस्त भागात केलेल्या सेवेबद्दल त्यांना सन्मानाचा 'सॅल्यूट' मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पोलीस सेवेत चांगले कर्तव्य बजावणाºया पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना पोलिस विभागाच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना अधिक चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष खडतर सेवा देणाºयांना विशेष सेवा पदक, १५ वर्ष उत्कृष्ट सेवा केल्यावर अंतरिक सुरक्षा सेवा पदक, १५ वर्ष उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात येते. गडचिरोली, गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागात दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळ खडतर सेवा देणाºया पोलिसांना विशेष सेवा पदकाने गौरविण्यात येते.
यावर्षी जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकारी, कर्मचाºयांची विशेष सेवा पदकासाठी निवड झाली आहे. २६ जानेवारी रोजी पोलिस कवायत मैदानावर होणाºया मुख्य शासकिय ध्वजारोहण समारंभात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते त्यांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सीईओ एस. शन्मुगराजन उपस्थित राहणार आहे.

विशेष सेवा पदकाचे मानकरी
पोलिस कल्याण शाखेचे पोलिस निरीक्षक गिरीष ताथोड, सायबर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण मोरे, चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मिलींदकुमार दवणे, मेहकर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर शिवणकर, पोलीस मुख्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल संदिपसिंह राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल सुनील शेगोकार, मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल मनोजकूमार उमाळे यांना विशेष सेवा पदक देण्यात येणार आहे.

Web Title: Special Service Medal for 8 Police in Buldana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.