स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाच्या कामांना गती

By admin | Published: November 14, 2014 10:47 PM2014-11-14T22:47:46+5:302014-11-14T22:47:46+5:30

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी तांत्रिक अभियानाच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध.

Speed ​​up toilets work due to Swachh Bharat Abhiyan | स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाच्या कामांना गती

स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाच्या कामांना गती

Next

बुलडाणा : केंद्र व राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे स्वच्छ भारत अभियान असे नामकरण करण्यात आले आहे. या अं तर्गत वैयक्तिक शौचालयासाठी आता १२ हजार रुपये अनुदान मिळत असल्याने ही यंत्रणा राबविणार्‍यांना दिलासा मिळाला असून, शौचालयाच्या कामांना गती आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४,२१,२८३ कुटुंब आहेत. यातील २,३२,६00 कुटुंबांकडे शौचालय आहेत. त्यामुळे शंभर टक्के शौचालय निर्मि तीसाठी आता केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचा जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग कामाला लागला आहे. जिल्हास्तरावर स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शौचालय आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी तांत्रिक अभियानाच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध केले जाणार आहे.

Web Title: Speed ​​up toilets work due to Swachh Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.