‘प्लास्टिक टाळा’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:59 PM2019-08-27T14:59:58+5:302019-08-27T15:00:02+5:30
अमरावती येथील प्रयास संस्थेचे डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक मिशन-ओ-२ या सामाजिक संघटनेच्यावतीने रविवारी स्थानिक केमिस्ट भवनात ‘प्लास्टिक टाळा’ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत अमरावती येथील प्रयास संस्थेचे डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पर्यावरणापासून घेतले आॅक्सीजन परत पर्यावरणाला देण्यासाठी खामगाव शहरात मिशन ओ-२ या संघटनेकडून गत दीड महिन्यांपासून शहरात विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात ६०० वृक्षांची लागवड करण्यात आल्यानंतर रविवारपासून संस्थेने ‘प्लास्टिक टाळा’ उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचा पहीला टप्प्यात रविवारी स्थानिक केमिस्ट भवनात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पर्यावरण प्रेमींना पीपीटी प्रेझेन्टेशनद्वारे डॉ. अविनाश सावजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, के. डी. पडोळ, शीतल पडोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आगामी काळात प्लास्टीक टाळा मोहिमेतंर्गत शहरातील विविध शालेय संस्थांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच मिशन ओ-२ अंतर्गत लावण्यात आलेल्या विविध वृक्षांची निगा राखणे, व्यसनमुक्ती तसेच आगामी काळातील गंभीर समस्या बनलेल्या मोबाईलचे वेड सोडविण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यशाळेत पर्यावरण प्रेमींचा सहभाग!
प्लास्टिक टाळा कार्यशाळेत शहरातील विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांसह शालेय शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींना आमंत्रित करण्यात आले. यावेळी रामदल गणेश मंडळाचे चंदू मोहता, त्रिशुल गणेशोत्सव मंडळाचे शेखर पुरोहित, अनमोल पोफळी, उमेश अग्रवाल, देवेश भट्टड, गजानन वायचाळ, सुधीर मुळे, गणेश बोराडे, तरूणाईचे उमाकांत कांडेकर, मुक्तांगणचे नितीन भारसाकळे, मिशन ओ-२ चे बिपीन गांधी, डॉ. कालीदास थानवी, अनिल कानडे, विष्णू पुरोहित, बाळू भटकर ,शिवनेरी अध्यक्ष किशोर लोखंडे ,अशोक पूरोहित ,निलेश पूरोहीत राहूल वसाडकर , मोहीत बोहरा , राजू भटकर आदींची उपस्थिती होती.