बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Published: July 16, 2017 08:18 PM2017-07-16T20:18:14+5:302017-07-16T20:18:14+5:30
धाड (बुलडाणा): बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत नवी दिशा नवे पर्व नवे संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून ३ हजार ७०० जोडप्याच्या घरावर स्टीकर लावण्याचे व संदेशपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड (बुलडाणा): चांडोळ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत नवी दिशा नवे पर्व नवे संकल्प या कार्यक्रमाच्या माध्यमातून ३ हजार ७०० जोडप्याच्या घरावर स्टीकर लावण्याचे व संदेशपत्र देण्याचे काम बुधवार पासून सुरू करण्यात आले.
सदर अभियानास चांडोळ प्रा.आ.केंद्रांतर्गत २१ गावात वैद्यकीय अधिकारी सैय्यद अफसर यांनी सुरूवात केली असून पाच दिवसात १ हजार ४९१ योग्य जोडप्यांच्या घरावर स्टीकर लावून त्यांना संदेश पत्र देण्यात आले आहे. या गावांमध्ये आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, सर्व आरोग्य कर्मचारी हे डॉ.सय्यद अफसर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात ग्रामसभेद्वारे जि.प.सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ फलकाचे अनावरण करुन सर्व मान्यवरांसोबत घरोघरी स्टीकर लावत असून याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ.पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना यांचे स्वाक्षरीचे आवाहन पत्र योग्य जोडप्यांचे नावे लिहून त्यांना देत आहे. प्रा.आ.केंद्रांतर्गत ३ हजार ७०० जोडप्यांना स्टीकर व आवाहनपत्र देण्याचे काम या पंधरवाड्यात होणार असून आजपर्यंत पाच दिवसात प्रा.आ.केंद्र अंतर्गत येणाऱ्या २१ गावातील १ हजार ४९१ जोडप्यांना आवाहनपत्रे देऊन घरावर स्टीकर लावण्यात आले आहे.