धाडमध्ये रक्तदान महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिदास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:35+5:302021-07-07T04:42:35+5:30
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दरवर्षी धाड येथे ५ जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते. दरवर्षी त्यास चांगला ...
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दरवर्षी धाड येथे ५ जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असते. दरवर्षी त्यास चांगला प्रतिसाद मिळतो. तसाच या वर्षीही तो मिळाला. युवा वर्गाने कोरोनाच्या संकट काळात असलेली त्यांची सामाजिक जबाबदारी अचूक ओळखत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. सोबतच रक्तपेढीत गरज असते तेव्हा सातत्याने प्रहार जनशक्ती पक्ष पुढे आलेला आहे. भविष्यातही त्याच पद्धतीने आमचे योगदान राहील, असे वैभवराजे मोहिते यांनी या वेळी स्पष्ट केले. रक्तदानाच्या महायज्ञामध्ये दरवर्षी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्ह्यात मोठे योगदान देत आहे.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रदीप टाकसाळ, अक्षय राऊत, सोनू वाघ, सागर गुजर, विष्णू घाडगे, सचिन नेमाने, गणेश जाधव, संतोष उबाळे, विलास ठाकरे, सागर गायकवाड, सय्यद मोहोम्मद, विनोद पवार, शुभम कुटे, आशिष उबाळे, सुनील उगले, गणेश नागवे, राजीक अहेमद, सय्यद नसीर, समाधान जाधव, दिनेश भुते, राजू गायकवाड, सुरेश नेमाडे व सुभाष मोहिते यांनी पुढाकार घेतला.
शासकीय रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी संजय सपकाळ, विनोद झगरे, रक्तपेढी तंत्रज्ञ सूरज देशमुख, नयन वऱ्हाडे, सीमा मेश्राम, पूजा बनकर, ज्ञानेश्वर गाडेकर, मोसीन पठाण यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनीही रक्तदानादरम्यान महत्त्वपूर्ण योगदान दिले.
--टायगर ग्रुपतर्फे आज शिबिर--
टायगर ग्रुप बुलडाणा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीमध्ये ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन टायगर ग्रुप व मनसेच्या बुलडाणा शहर शाखेच्या वतीने मनोज पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.