बुलडाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 12:06 AM2017-06-06T00:06:09+5:302017-06-06T00:06:09+5:30

बुलडाणा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला.

Spontaneous response to Buldda | बुलडाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. सकाळी ९ वाजता विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली काढून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संपाच्या चौथ्या दिवशी विविध राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या पृष्ठभूमिवर बुलडाण्यात विविध राजकीय पक्षांनी रॅली काढून शहर बंदचे आवाहन केले. प्रारंभी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी गांधी भवन परिसरात एकत्र आले.
त्यानंतर जयस्तंभ चौक, संगम चौक मार्गे रॅली काढून प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यात काँग्रेसचे विजय अंभोरे, जि.प.सदस्य जयश्री शेळके, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, अ‍ॅड. शरद राखोंडे, सुनील सपकाळ, विनोद बेंडवाल, रियाजखा पठाण, नगरसेवक अजहर खान, आकाश दळवी, सुरेश सरकटे, जाकीर कुरेशी, अमित टेलर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके, अ‍ॅड. सुमित सरदार, शिवसेनेचे संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, माजी जि.प.सदस्य अशोक इंगळे, लखन गाडेकर, नगरसेवक सोनु जाधव, आशिष खरात, दीपक सोनुने, जीवन उबरहंडे, अनूप श्रीवास्तव, नीलेश राठोड, शेतकरी संघटनेचे नामदेवराव जाधव, सुभाष गिरी आदींनी सहभाग घेतला होता.

प्रवाशांची गैरसोय
विविध राजकीय पक्षांनी बंदचे आवाहन केल्यामुळे एसटी महामंडळाने सकाळी ९ वाजेपासून प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचे जाहीर केले. त्यामुळे बसस्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकून पडले होते. दुपारी १ वाजताच्यादरम्यान पोलीस बंदोबस्तात काही एसटीची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

Web Title: Spontaneous response to Buldda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.