स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:06 AM2017-07-20T00:06:36+5:302017-07-20T00:06:36+5:30
मलकापूर येथे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ काँग्रेसचे आंदोलन
मलकापूर : शासनाच्या फसव्या कर्जमाफीविरुद्ध मलकापुरात भाराकाँने एल्गार पुकारला असून, आज १८ जुलै रोजी स्थानिक तहसील चौकात ‘माझी कर्जमाफी झाली नाही’, असे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, प्रथमदिनीच तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी सदर अर्ज भरल्याने या मोहिमेस शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले.
कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असून, ही कर्जमाफी फसवी आहे. याविरुद्ध भाराकाँने आज शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कास्तव माझी कर्जमाफी झाली नाही, अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेंतर्गत भरल्या जाणारे अर्ज पक्षाच्यावतीने महाराष्ट्र शासनाकडे तसेच तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाकडून सदर अज र् यावेळी दोन प्रतीत कार्यकर्त्यांकडून भरल्या जात असल्याची माहिती भाराकाँचे तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांनी दिली, तर मंगळवारी प्रारंभ झालेली ही मोहीम शहरात २४ जुलै सोमवारपर्यंत राबविल्या जाणार आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना या मोहिमेत आपला अर्ज भरून दिल्या जावा, त्यापासून कुणीही वंचित राहू नये, असाच प्रयत्न पक्षाचा राहणार आहे. अशी माहिती शहराध्यक्ष राजू पाटील यांनी दिली.
या मोहिमेप्रसंगी पक्षनेते डॉ. अरविंद कोलते, न.प. गटनेते राजेंद्र वाडेकर, हाजी रशिदखा जमादार, नगरसेवक अनिल गांधी, सनाऊल्लाखा जमादार, अॅड.जावेद कुरेशी, जाकीर मेमन, प्रा.अनिल खर्चे, युसूफ खान, अनिल जयस्वाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.