खेळातून सांघिक भावना निर्माण हाेते : राम डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:24+5:302021-02-08T04:30:24+5:30

अमडापूर : मैदानी खेळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक असून, खेळातून सांघिक भावना निर्माण होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक ...

Sport creates team spirit: Ram Dahake | खेळातून सांघिक भावना निर्माण हाेते : राम डहाके

खेळातून सांघिक भावना निर्माण हाेते : राम डहाके

googlenewsNext

अमडापूर : मैदानी खेळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक असून, खेळातून सांघिक भावना निर्माण होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी केले. ते उंद्री येथे राहुल बाेद्रे चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी बाेले हाेते.

यावेळी सरपंच भाई प्रदीप अंभोरे, बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान सुपेकर आदी उपस्थित हाेते. कबड्डी स्पर्धेत प्रथम बक्षीस २१ हजार रुपयांचे खामगाव संघाने पटकावले. द्वितीय बक्षीस ब्लॅक कॅप उंद्री संघाने त तृतीय बक्षीस ११ हजार के.जी.एन. कंझारा संघाने पटकावले. चतुर्थ बक्षीस सात हजार ५०० रुपये पाकिजा उंद्री संघाने पटकावले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा पवार यांनी अंतिम सामना सुरू असताना सहकाऱ्यांसह भेट दिली. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान सुपेकर, मेहकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर सुरुशे, मोहनशेठ जाधव, उंद्री गावचे सरपंच भाई प्रदीपजी अंभोरे, रामभाऊ भुसारी, नामदेवराव राठोड, जलील भाई, रवी तरळकर, गोलू इंगळे, गजानन गव्हाणे, अमान खान, शे.इलियास, गोविंदा जगताप, सय्यद सैराब, प्रमोदजी टेकाळे व सहकारी उपस्थित होते.

Web Title: Sport creates team spirit: Ram Dahake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.