‘मी टिळक स्मारक बोलते आहे’चे बहारदार सादरीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 02:55 PM2019-11-19T14:55:24+5:302019-11-19T14:55:35+5:30
लोकमान्य टिळकांच्या भेटीवर आधारीत लघू नाटीका या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील टिळक स्मारक महिला मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा समारोप सोमवारी करण्यात आला. यावेळी टिळक स्मारकाच्या शताब्दीचा इतिहास सांगणारा‘मी टिळक स्मारक बोलते आहे’या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
टिळक स्मारक महिला मंडळाच्या उत्सव प्रमुख विद्याताई कावडकर यांचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण असलेल्या या कार्यक्रमाला टिळक स्मारक सभागृहात सायंकाळी ७ वाजता सुरूवात झाली. यावेळी शहरातील प्रसिध्द गायिका प्राजक्ता हसबनिस यांनी नांदी आणि गणेश वंदना सादर केली. मंगळा गौरीच्या खेळानंतर टिळक स्मारकासाठी योगदान असलेल्या लोकमान्य टिळकांच्या भेटीवर आधारीत लघू नाटीका या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरली. त्यानंतर टिळक स्मारक महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सभागृहात गोंधळ सादर झाला, त्यावेळी उपस्थित महिलांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टिळक स्मारक महिला मंडळाचा शंभर वर्षाचा चालता-बोलता इतिहासच या कार्यक्रमाद्वारे रंगमंचावर मांडण्यात आला.
यावेळी सर्वोदय मंडळाच्या सरूताई सेवक यांच्यासह शहरातील प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टिळक स्मारक महिला मंडळाच्या अध्यक्ष सुषमा भाटे, सचिव श्वेता तारे, उपाध्यक्ष ज्योती खांडेकर, सहसचिव रेखा खानझोडे, सीमा देशमुख आदींसह महिलांनी परिश्रम घेतले.
सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या बहारदार कार्यक्रमात माधुरी हसबनीस, अदिती गोडबोले, रंजना मुळे, अनुजा चितळे, कविता शिंगटे, शोभा शिंगटे, मंजिरी पाटील, सीमा पाटील, सुजाता वकील, सीमा बोबडे, किरण बोबडे, श्रध्दा बोबडे, विद्याताई देशमुख, जया तायडे, अनुराधा देशमुख, मुग्धा पाटील आसावरी भडंग, गायत्री शिंदे यांनी विविध नृत्य तसेच लघू नाटीकांमध्ये सहभाग दिला. तर प्राजक्ता हसबनीस, सीमा देशमुख, विणा पाठक यांनी गीतं सादर केलीत. संगीत साथ रामदास खापरे, पराग दुबे, श्रीपाद कुळकर्णी यांनी दिली.