नवीन ‘बदला’साठी पथक रद्द; अप्पर पोलीस अधिकक्षकांची माहिती

By अनिल गवई | Published: October 1, 2022 01:43 PM2022-10-01T13:43:56+5:302022-10-01T13:44:11+5:30

पथक प्रमुखांसह सहा सदस्यीय पथकाला गुरूवारी आपल्या मुळ ठिकाणी परत पाठविण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली.

Squad scrapped for new 'change'; Information of Upper Police Officers shrava dutta | नवीन ‘बदला’साठी पथक रद्द; अप्पर पोलीस अधिकक्षकांची माहिती

नवीन ‘बदला’साठी पथक रद्द; अप्पर पोलीस अधिकक्षकांची माहिती

googlenewsNext

खामगाव: गत वर्षभरात खामगाव येथील पथकाकडून घाटाखालील सहा तालुक्यासह घाटावरील काही तालुक्यात १३५ पेक्षा अधिक कारवाई करण्यात आल्या. दरम्यान, पथकात नवीन लोकांना संधी देण्यासाठी खामगाव येथील अपर पोलीस अधिक्षक पथक रद्द करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी दिली.

पथक प्रमुखांसह सहा सदस्यीय पथकाला गुरूवारी आपल्या मुळ ठिकाणी परत पाठविण्यात आले. त्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. दरम्यान, गत दहा महिन्यांपासून कार्यरत पथक बदलाची नित्याचीच प्रकीया करण्यात आल्याचे अपर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. सातत्याने त्याच त्या लोकांना संधी दिल्यास, कारवाईच्या प्रक्रीयेत शिथिलता येते. त्याचप्रमाणे शंका-कुशंकांना वाव मिळतो, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. तथापि, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच कारवाई प्रक्रीया अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठीच लवकरच नवीन पथक गठीत केल्या जाणार असल्याचेही अपर पोलीस अधिक्षक श्रवण दत्त म्हणाले. पथक गठीत झाल्यानंतर  गत दहा महिन्यांच्या काळात १३५ यशस्वी कारवाई केल्याचेही ते शेवटी म्हणाले.

Web Title: Squad scrapped for new 'change'; Information of Upper Police Officers shrava dutta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.