एसटी आगाराचे नियोजन कोलमडले; परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:53 AM2018-02-21T01:53:09+5:302018-02-21T01:53:40+5:30

मेहकर: मेहकर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी मेहकर येथे येत असतात; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसला टायर नसल्याने बस बंद आहेत. अधिकार्‍याच्या नियोजनाअभावी परीक्षेच्या पूर्वसंध्येला मेहकर आगाराचा कारभार ढेपाळला आहे.

ST Agar's appointment collapses; Students facing the test! | एसटी आगाराचे नियोजन कोलमडले; परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडचणीत!

एसटी आगाराचे नियोजन कोलमडले; परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडचणीत!

Next
ठळक मुद्देटायरअभावी बस उभ्या!

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: मेहकर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी मेहकर येथे येत असतात; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसला टायर नसल्याने बस बंद आहेत. अधिकार्‍याच्या नियोजनाअभावी परीक्षेच्या पूर्वसंध्येला मेहकर आगाराचा कारभार ढेपाळला आहे.
मेहकर तालुक्याला जवळपास १४0 खेडे विभाग जोडलेला आहे; मात्र अधिकार्‍यांचे कोणतेही नियोजन नसल्याने अनेक गावच्या एसटीच्या  फेर्‍या बंद पडल्या आहे. एसटी बसला टायर नसल्याने १६ एसटी बसेस बंद आहेत, तर अनेक गाड्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे हय़ा गाड्यासुद्धा आगारामध्ये उभ्या आहेत. २१  फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा सुरू होत आहे. अशा वेळी ग्रामीण भागात जाणार्‍या एसटीच्या फेर्‍या बंद असल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर होण्याची शक्यता आहे. एसटी बसेसची अवस्था खराब असल्याने मोठय़ा शहराला धावणार्‍या फेर्‍यासुद्धा बंद पडल्या आहेत. स्थानिक अभिकार्‍यासह वरिष्ठ अधिकार्‍यांचे मेहकर आगाराकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने आगाराचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक गावच्या एसटी बसेस वेळेवर सुटत नाही त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना बस स्थानकावर ताटकळत बसावे लागते. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रासपच्या वतीने आंदोलनाचा इशारा 
मेहकर आगाराचा कारभार ढेपाळला असून, एसटी बसेसला टायर नसल्याने अनेक गाड्या बंद अवस्थेत आहेत. काही गाड्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक गावांच्या फेर्‍या रद्द होत आहेत. विद्यार्थी गोर गरीब नागरिक यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सुविधा द्यावी अन्यथा रासपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रासपचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन गारोळे, तालुका अध्यक्ष गजानन बोरकर, शहर अध्यक्ष अविनाश लाड, ओकार खांडेकर, शिद्धेश्‍वर राऊत, गजानन भुतेकर, दिनेश सावंत, शिवाजी औदगे, शिवाजी ढवळे, शे. सदाम शे. रहेमान शे. कुरेशी यांनी दिला आहे.

टायरची मागणी वरिष्ठाकडे केलेली आहे. टायर आल्यानंतर गाड्या सुरळीत सुरू होतील.
- रणवीर कोळपे
कार्यशाळा अधीक्षक, मेहकर आगार
 

Web Title: ST Agar's appointment collapses; Students facing the test!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.