चालक-वाहकांच्या मुक्कामासाठी एसटी करणार व्यवस्था
By admin | Published: May 12, 2015 12:01 AM2015-05-12T00:01:20+5:302015-05-12T00:06:38+5:30
एसटीने घेतला पुढाकार; ग्रामीण भागातील व्यवस्थेचे सर्वेक्षण.
खामगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागात मुक्कामी असणार्या बसमधील चालक-वाहकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. मु क्कामी राहणार्या ठिकाणी कर्मचार्यांना काय सुविधा आहे, याबाबत नुकतेच सर्वेक्षण सुरू केले असून, सुविधा नसणार्या ठिकाणी बसमध्येच झोपण्याची व्यवस्था करण्याचे धोरण अवलंबिले आहे. सद्य:स्थितीत राज्यात साडेसतरा हजारांच्या जवळपास एसटी बसेस धावत आहेत. सुमारे सव्वा लाख कर्मचारी महामंडळात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर पोहचण्याचे काम एसटीने केले आहे. वाढत्या स्पर्धेच्या युगात खासगी वाहनाच्या तुलनेत एसटी काहीशी मागे पडली तरीही ग्रामीण भागात आजही एसटीविना प्रवाशांना पर्याय नाही. १९९५ पर्यंत मुक्कामी असणार्या बसेसमध्ये चालक-वाहकासाठी झोपण्यासाठी सीटची व्यवस्था होती. तर मुक्कामी असणार्या गावात सरपंच, पोलीस पाटील कर्मचार्यांची व्यवस्था करतात. या कर्मचार्यांची निवासाची कुठलीच व्यवस्था नसल्याने त्यांना एसटीतच झोपावे लागते. उन्हाळा व पावसाळा मात्र चालक वाहकांना खूप त्रास सहन करावा लागतो. याबाबत कर्मचारी संघटनेच्यावतीने वेळोवेळी वरिष्ठांकडे निवासी सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली हो ती. अखेर चालक-वाहकांना मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था याबाबत वरिष्ठांकडून प्रत्येक आगार व्यवस्थापकांना माहिती मागविण्यात आली आहे. संबंधित आगारानेही मुक्कामी फेर्यांचे नियोजन करून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. महामंडळाने चालक वाहकांच्या सोयीसाठी उचललेले पाऊल नक्कीच कर्मचार्यांची दखल घेणारे ठरेल.