एसटी महामंडळाला दरमहा १४५ कोटींचा तोटा

By admin | Published: September 10, 2014 02:10 AM2014-09-10T02:10:57+5:302014-09-10T02:10:57+5:30

शासनाकडून अनुदान वेळेवर मिळत नसल्याने महामंडळाच्या अडचणीत वाढ.

ST corporation losses of Rs 145 crores per month | एसटी महामंडळाला दरमहा १४५ कोटींचा तोटा

एसटी महामंडळाला दरमहा १४५ कोटींचा तोटा

Next

अमोल जायभाये/ खामगाव
एसटीचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. भरिस भर, शासनाकडून अनुदान वेळेवर मिळत नसल्याने उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसवणे महामंडळाला अवघड झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला दरमहा १४५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
एसटीच्या सुरुवातीच्या काळात, महामंडळाने झपाट्याने प्रगती केली; मात्र गत काही वर्षांपासून अवैध वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने त्याचा फटका एसटीला बसला आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध-अपंगांना सवलती दिल्या जात असून, वेगवेगळय़ा योजनांचा भारही महामंडळाला उचलावा लागतो. महामंडळाचा दरमहा खर्च सुमारे ६२५ कोटी रुपये एवढा आहे. त्यापैकी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी २६0 कोटी रुपये, डिझेल व अन्य इंधनासाठी २४0 कोटी रुपये तसेच टायर ट्यूब व अन्य सुट्या भागांसाठी ५0 कोटी रुपये, तर ५0 कोटी रुपये अन्य कामांसाठी खर्च होतात. महामंडळाचे मासिक उत्पन्न ४७0 कोटी रूपये आहे. त्यामुळे १४५ कोटी रुपयांची तूट दरमहा सहन करावी लागत आहे.
राज्य सरकारने वर्षभरात अनुदानापोटी ९0५ कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. आणखी काही रक्कम सरकारकडून येणे बाकी आहे.

Web Title: ST corporation losses of Rs 145 crores per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.