कोरोनामुळे बिघडले एसटी महामंडळाचे अर्थचक्र - संदीप रायलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 07:13 PM2020-08-01T19:13:38+5:302020-08-01T19:19:02+5:30

एसटी महामंडळाचे बुलडाणा विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांच्याशी साधलेला संवाद... 

ST Corporation's economic cycle disrupted due to corona - Sandeep Rayalwar | कोरोनामुळे बिघडले एसटी महामंडळाचे अर्थचक्र - संदीप रायलवार

कोरोनामुळे बिघडले एसटी महामंडळाचे अर्थचक्र - संदीप रायलवार

Next

- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्याचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होत आहे. पहिल्यांदाच कोरोनामुळे  एसटी महामंडळाचे अर्थचक्र बिघडले आहे. लॉकडाऊनच्या गेल्या चार महिन्याच्या काळात बुलडाणा विभागाचे जवळपास ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली. सध्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा राज्य परिवहन महामंडळाला बसत आहे, त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे बुलडाणा विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांच्याशी साधलेला संवाद... 


कोरोनाचा एसटी महामंडळावर काय परिणाम झाला?
कोरोनामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. जिल्हांतर्गत बसेस सुरू केल्या आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. मात्र आपण प्रवाशांची सर्व खबरदारी घेऊन बस सोडतो. ५० कोटींचे नुकसान गेल्या चार महिन्यात झालेले आहे. सैलानी यात्रा, पंढरपूर यात्रा या मोठ्या उत्पन्नाच्या हंगामावर यंदा एसटीला पाणी सोडावे लागले.


मालवाहतूक वाढविण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत?  
सध्या एसटीच्या मालवाहतूकीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतू मालवाहतूक आणखी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ७२ शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार यांच्या मार्फत मालवाहतूक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 


कर्मचाºयांचे वेतन कसे करता? 
एसटी महामंडळाचे पहिल्यासारखे उत्पन्न नसल्याने कर्मचाºयांचे वेतन वेळेवर व पूर्ण देणे शक्य झालेले नाही. एप्रिल महिन्याचे जवळपास वेतन देणे झाले आहे. मे आणि जूनचे ५० टक्के वेतन बाकी आहे. जुलै महिन्याचे वेतन अद्याप आपण देऊ शकलो नाही. 


उभ्या असलेल्या बसेसची देखरेख कशी केली जाते? 
जेवढ्या बसेस सध्या सुरू आहेत, त्याची नियमीत सर्व्हिसिंग होते. परंतू ज्या बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत, त्यांची बॅटरी व इतर उपकरणे खराब होऊ नये, यासाठी वेळोवेळी पाहणी केल्या जाते. तीन दिवसाला एकदा टायर प्रेशर, बॅटरी चार्ज राहण्यासाठी थोडावेळ बस सुरू करून ठेवल्या जातात.      


चालक वाहकांच्या ड्यूट्या कशा लावण्यात येतात?
सध्या १० हजार किलो मिटरच अंतर होते. त्यामुळे रोटोशननुसार चालक वाहकांच्या ड्यूट्या लावण्यात येतात. प्रत्येकाला टप्प्याटप्याने बोलावण्यात येते. ज्या बसेस सुरू आहेत, त्या सॅनिटाईज करूनच वापरण्यात येतात. कार्यालयात हायफो मारण्यात येते. वर्कशॉप, जिल्ह्यातील सर्व डेपो, बसस्थानक याठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहे. कर्मचाºयांना मास्क वाटप केलेले आहेत. प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध वितरण केलेले आहे. 


कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. उत्पन्न भरूण काढण्यासाठी  एसटीची मालवाहतूक सुरू आहे. - संदीप रायलवार

Web Title: ST Corporation's economic cycle disrupted due to corona - Sandeep Rayalwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.