मालवाहतुकीमुळे एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:38+5:302021-05-30T04:27:38+5:30
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक - ३४ वाहतूक सुरू असलेले ट्रक - ३४ कोरोनाकाळात महिन्याला २५ लाखांची कमाई १. बुलडाणा ...
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक - ३४
वाहतूक सुरू असलेले ट्रक - ३४
कोरोनाकाळात महिन्याला २५ लाखांची कमाई
१. बुलडाणा विभागांतर्गत बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद हे सात आगार आहेत.
२. सातही आगार मिळून एकूण ३४ मालवाहतूक करणारे ट्रक असून, संपूर्ण ट्रकद्वारे मालवाहतूक सुरू आहे.
३. सध्या महिन्याला साधारणत: २५ लाखांची कमाई एसटी महामंडळ बुलडाणा विभागाची सुरू आहे.
परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम
लांब पल्ल्यावर मालवाहतूक केल्यानंतर परतीसाठी मालवाहतुकीची ऑर्डर मिळेपर्यंत चालकाला त्याच ठिकाणी राहावे लागते. यात निवास, भोजनाव्यतिरिक्त वैयक्तिक खर्चही होत असल्याने चालकांना मोठा फटका बसत आहे.
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
मालवाहतूक ट्रकवरील चालकाला अंतर आणि मुक्काम या बाबी लक्षात घेऊन कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त १५०० रुपये ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, ॲडव्हान्सची ही रक्कम चालकाच्या वेतनातून कपात केली जात आहे. त्यामुळे चालकांना मोठा फटका बसत आहे.
उन्हाळ्याचे दिवस आहेत. लांब अंतरावरील मालवाहतूक करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. त्यातच ॲडव्हान्स म्हणून अल्पशी रक्कम दिली जात असून, तीही पगारातून कपात केली जाते. त्यामुळे ही कोरडीच सेवा झाली आहे. ॲडव्हान्सची रक्कम वेतनातून कपात करण्यात येऊ नये.
एक चालक.
सध्या मोजक्याच बसफेऱ्या सुरू असल्याने महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळाला मालवाहतुकीतून चांगल्यापैकी उत्पन्न मिळत आहे. मात्र, मालवाहतुकीकरिता आम्हाला दिली जाणारी रक्कम वेतनातून कपात केली जात आहे. महामंडळाने ॲडव्हान्सची रक्कम कपात करू नये.
एक चालक.
चालकांना अगोदरच तुटपुंजे वेतन मिळते. मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले असताना, चालक, वाहकांचे कुटुंबीय आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. महामंडळ तोट्यात आहे, हे मान्य असले तरी, सध्या विभागाला बऱ्यापैकी उत्पत्न मिळते. चालकांची ॲडव्हान्सची रक्कम वेतनातून कापू नये.
शेख उस्मान, प्रवासी सेवा संघटना.