एसटीच्या प्रवाशांना भाडेवाढीचा ‘फटाका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:14 AM2017-10-14T01:14:33+5:302017-10-14T01:15:03+5:30
बुलडाणा : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेर्या वाढवतानाच प्रवासी भाड्यातही १0 ते २0 टक्के वाढ करण्यात येणार असून, ऐन दिवाळीत प्रवाशांना फटाका लागणार आहे.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेर्या वाढवतानाच प्रवासी भाड्यातही १0 ते २0 टक्के वाढ करण्यात येणार असून, ऐन दिवाळीत प्रवाशांना फटाका लागणार आहे.
दिवाळी सणानिमित्त बुलडाणा आगाराने जादा गाड्यांची सोय केली असून, फेर्यांची संख्या दुप्पट केली आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटीचा पर्याय प्रवासी निवडतात. त्यामुळे एस. टी. महामंडळाने १४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान १0 ते २0 टक्क्यांनी जादा भाड्याची आकारणी होणार आहे. दिवाळीनिमित्त नोकरदार, कामगारवर्ग, शाळा, महाविद्यालयांना सुटी असते. या दरम्यान प्रवासी संख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली असते. त्यामुळे सहाजिकच एसटीवर प्रवाशांचा भार वाढतो. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांकडून एसटी बसलाच पसंती दिली जाते; मात्र राज्य परिवहन विभागाच्या वाढीव दराच्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवासी वर्गाच्या खिशाला फटका बसणार आहे. राज्य परिवहन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
यामध्ये १४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान प्रवासी सेवेला भाडेवाढ लागू होणार आहे. याशिवाय यवतमाळ, औरंगाबाद, बीड, पुणेसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महसूल वाढीसाठी निर्णय
एस. टी. महामंडळाने केलेल्या भाडेवाढीवर दरवर्षी प्रवासी नाराजी व्यक्त करतात; मात्र गत तीन वषार्ंपासून एसटी महामंडळाने केलेल्या भाडेवाढीमुळे चांगला महसूल मिळत आहे. यावर्षी साधी किंवा रातराणी बससाठी १0 टक्के, निमआराम बससाठी १५ टक्के व वातानुकूलीत बससाठी २0 टक्के भाडे वाढ करण्याचे परिपत्रक एसटी महामंडळाने काढले आहे.
एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ केली असली तरी सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा.
- दीपक साळवे,
स्थानक प्रमुख, बुलडाणा.