टायर रिमोल्डींग क्षेत्रातही एसटी उतरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 07:16 PM2020-08-19T19:16:57+5:302020-08-19T19:17:23+5:30

खासगी वाहनांसह, मोठी वाहने, शासकीय वाहनांचेही टायर रिमोल्डींग महामंडळ करणार आहे.

ST will also come down in the field of tire remolding | टायर रिमोल्डींग क्षेत्रातही एसटी उतरणार!

टायर रिमोल्डींग क्षेत्रातही एसटी उतरणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाचा फटका बसल्यामुळे गेल्या चार महिन्यात ६० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने आता टायर रिमोल्डींग क्षेत्रातही पदार्पण केले असून अमरावती येथील प्लॅन्ट मधून वाहनांचे टायर रिमोल्डींग करून मिळणार आहे. कोरोनाचा फटका बसल्यामुळे एसटी महामंडळ नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोध असल्याचे स्पष्ट होत आहे. खुल्या पद्धतीने आता एसटी टायर रिमोल्डींग व्यवसाय आणि मालवाहतुकीच्या व्यवसायत उतरत आहे. त्यामुळे खासगी वाहनांसह, मोठी वाहने, शासकीय वाहनांचेही टायर रिमोल्डींग महामंडळ करणार आहे.

गेल्या काही महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक मधल्या काळात जिल्ह्यातंर्गत सुरू झाली होती. मात्र प्रवाशांची मर्यादा पाहता एसटी महामंडळाला यातून फारसे उत्पन्न मिळालेले नाही. दरम्यान, १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधून आंतरजिल्हास्तरावर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र एकदम प्रवाशी वाहतूक पूर्ववत सुरू होणार नसली तरी सोमवारपासून त्यानुषंगाने प्रवाशी भारमान विचारात घेवून बुलडाणा विभागा त्यांच्या बसगाड्याचे शेड्यूल ठरविणार आहे. तुर्तास प्रवाशी मर्यादाही निश्चित करण्यात आल्याने निम्म्या प्रवाशांवरच ही वाहतूक होणार असल्याचे संकेत विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
त्यानुषंगाने आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुकीबाबत काही नवीन शेड्यूल बुलडाणा विभागाने आखले असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्यक्षात काय प्रतिसाद मिळतो यावर पुढील भूमिका ठरविणार असल्याचे रायलवार यांनी सांगितले. त्यामुळे एसटी महामंडळाने कोरोना संकटाच्या काळात कात टाकून प्रवाशी वाहतुकीसोबतच नवे उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न चालवले आहे.

Web Title: ST will also come down in the field of tire remolding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.