ग्रामीण भागात बस सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:25+5:302021-03-14T04:30:25+5:30
वाळूची अवैध वाहतूक वाढली, प्रशासनाचे दुर्लक्ष लाेणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. रेतीची ...
वाळूची अवैध वाहतूक वाढली, प्रशासनाचे दुर्लक्ष
लाेणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. रेतीची वाहतूक करणारे टिप्पर उलटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली हाेती. या वाहतुकीकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
आराेग्य उपकेंद्राचे काम दर्जेदार करा
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ष २०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या प्राथमिक आराेग्य उपकेंद्राचे काम दर्जेदार करण्याची मागणी निलेश काेंडू गायकवाड यांनी ग्रामविकासमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. बांधकामात कमी दर्जाचे हाेत आहे. या बांधकामाची चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी नीलेश काेंडू गायकवाड यांनी निवेदनात केली आहे.
माेताळ्यात चाेरट्यांचा हैदाेस
माेताळा : शहरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. शहरातील आठवडी बाजारातील एक दुकान चाेरट्यांनी फाेडून एक लाख एक हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी संकटात
किनगाव राजा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील आठवडी बाजार रद्द केले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी करत करावी लागत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी गावाेगावी जाऊन टरबूज विकत आहेत.
गहू उत्पादक शेतकरी संकटात
बिबी : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध असल्याने गव्हासह इतर पिकांची पेरणी केली आहे. सध्या गहू साेंगणीला आलेला आहे. अशातच वातावरणात बदल हाेत असल्याचा फटका गहू पिकाला बसत आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन
जानेफळ : परिसरात गत काही दिवसांपासून काेेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रशासनाने काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असले तरी अनेक जण नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रभारीपदी काकड यांची नियुक्ती
देऊळगावराजा: राष्ट्रीय समाज पक्षाच्या बुलडाणा जिल्हा प्रभारीपदी तालुक्यातील अमोल काकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी ही नियुक्ती केली आहे.
पाेकराअंतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ
बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरूळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. जिल्ह्यातील ४१३ गावांमधील शेतकरी या प्रकल्पांतर्गत सुखी, समृद्ध हाेण्यास मदत झाली आहे.
पार्किंगची व्यवस्था करा
बुलडाणा : प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कार्यालये आहेत. इमारत परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक कुठेही आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी संदीप गायकवाड यांनी केली आहे.