ग्रामीण भागात बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:34+5:302021-03-14T04:30:34+5:30

वाळूची अवैध वाहतूक वाढली, प्रशासनाचे दुर्लक्ष लाेणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून रेतीचे उत्खनन करून वाहतुक सुरू आहे. रेतीची ...

Start buses in rural areas | ग्रामीण भागात बस सुरू करा

ग्रामीण भागात बस सुरू करा

googlenewsNext

वाळूची अवैध वाहतूक वाढली, प्रशासनाचे दुर्लक्ष

लाेणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून रेतीचे उत्खनन करून वाहतुक सुरू आहे. रेतीची वाहतूक करणारे टिप्पर उलटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली हाेती. या वाहतुकीकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

आराेग्य उपकेंद्राचे काम दर्जेदार करा

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ष २०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या प्राथमिक आराेग्य उपकेंद्राचे काम दर्जेदार करण्याची मागणी नीलेश काेंडू गायकवाड यांनी ग्रामविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. बांधकामात कमी दर्जाचे हाेत आहे. या बांधकामाची चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी नीलेश काेंडू गायकवाड यांनी निवेदनात केली आहे.

माेताळ्यात चाेरट्यांचा हैदाेस

माेताळा : शहरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. शहरातील आठवडी बाजारातील दुकाने चाेरट्यांनी फाेडून एक लाख एक हजार रुपयांचा एवज लंपास केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी संकटात

किनगावराजा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील आठवडी बाजार रद्द केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी करत करावी लागत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी गावाेगावी जाऊन टरबूज विकत आहेत.

Web Title: Start buses in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.