व्यापाऱ्यांकडून कापसाच्या खरेदीस प्रारंभ! बोरजवळा येथे मिळाला सर्वाधिक ८१०० रूपये क्विंटलचा भाव
By अनिल गवई | Published: October 7, 2022 02:42 PM2022-10-07T14:42:25+5:302022-10-07T14:43:05+5:30
Cotton Market: खामगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी सीतादई (कापूस वेचणीला सुरूवात करताना केले जाणारे पूजन )होण्यापूर्वीच काही खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे.
- अनिल गवई
खामगाव: तालुक्यातील अनेक ठिकाणी सीतादई (कापूस वेचणीला सुरूवात करताना केले जाणारे पूजन )होण्यापूर्वीच काही खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदीला प्रारंभ केला आहे. यामध्ये बोरजवळा येथील एका शेतकºयाच्या कापसाला सर्वाधिक ८१०० रुपये क्विंटल रुपयांचा भाव देण्यात आला आहे. दरम्यान, जिनिंग प्रेसिंगकडून अद्यापपर्यंत कापूस खरेदीस सुरूवात करण्यात आलेली नाही.
पावसामुळे यावर्षी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सीतादई लांबणीवर पडली आहे. अनेक शेतकºयांचे पांढरे सोने शेतातच असताना खामगाव तालुक्यात काही ठिकाणी कापसाचे पिक घरी आणण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गात आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी सणासुदीच्या दिवसांत पांढºया सोन्याची तसेच इतर शेतमालाची विक्री करीत आहेत. त्याअनुषंगाने कापसाच्या खासगी व्यापाऱ्ययांनी कापूस खरेदीला सुरूवात केली आहे. अनेकांनी दसºयाच्या शुभ मुहूर्तावर कापूस विक्रीचा मुहूर्त साधला.
८१०० रुपयांची सर्वाधिक बोली
- खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर खासगी व्यापाऱ्ययांनी कापसाची खरेदी केली. यावेळी शेतकरी कल्याणसिंह तुळसिंह तोमर यांच्या कापसाला ८१०० रुपयांचा सर्वाधिक भाव देण्यात आला.
खासगी व्यापाऱ्य यांकडून कापसाची खरेदी
जिनिंग-प्रेसिंगकडून कापसाची खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, भालेगाव बाजार, रोहणा, काळेगाव, निपाणा, बोरजवळा, बोरी अडगाव परिसरात काही खासगी व्यापाऱ्यानी कापूस खरेदीला सुरूवात केली आहे.
पावसामुळे कापसात ओलावा
खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पावसात ओलावा आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर कापसाची खरेदी सुरू करण्यात आली नसल्याचे समजते.