खामगावातील बंद घंटागाड्या सुरू करा, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By अनिल गवई | Published: March 7, 2024 05:38 PM2024-03-07T17:38:32+5:302024-03-07T17:39:21+5:30
खामगाव शहरातील ५३ पैकी १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. या घंटागाडी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात.
खामगाव: शहरातील बंद करण्यात आलेल्या १३ घंटागाडी पुन्हा सुरू कराव्या या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, खामगाव शहरातील ५३ पैकी १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. या घंटागाडी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे. त्याचप्रमाणे कंत्राटदाराला पाठीशी घालणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर तसेच कंत्राटदाराचे देयक काढणार्या ऑडीटरवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली. या निवेदनावर यावेळी मनसे शहराध्यक्ष आनंद गायगोळ, शहर उपाध्यक्ष आकाश पाटील सह मनसे घंटागाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद इंगळे, विक्की शिंदे, निखिल मांगले आदींच्या स्वाक्षरी आहेत.