कोविड केअर सेंटर पुर्ण क्षमतेने सुरू करा : शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:32 AM2021-03-08T04:32:26+5:302021-03-08T04:32:26+5:30

कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक ६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे ...

Start Covid Care Center at Full Capacity: Sniffing | कोविड केअर सेंटर पुर्ण क्षमतेने सुरू करा : शिंगणे

कोविड केअर सेंटर पुर्ण क्षमतेने सुरू करा : शिंगणे

Next

कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक ६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावर्षी होणाऱ्या सर्व यात्रा रद्द करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, जास्त गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करावे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्याठिकाणी असलेले तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी टाकावी. रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून चाचणी वाढवावी. तसेच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची योग्य तपासणी करावी. कोविड केअर सेंटरवर रुग्ण असो की नसो, कर्मचारी कार्यरत ठेवावे. बंद असलेली कोविड केअर सेंटर येत्या तीन दिवसात सुरू करावी. तसेच हिवरा आणि नांदुरा येथील सीसीसी सेंटर तातडीने सुरू करावे.

ते म्हणाले की, जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब आहे. भविष्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे यंत्रणेने तयारीत राहावे, लस घेतली म्हणजे कोविड संसर्ग नियमांपासून दूर पळू नये. त्यामुळे लस घेणाऱ्याने देखील त्रिसूत्रींचा अवलंब करावा, तसेच जनतेनेदेखील त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच रक्त पुरवठा, लसीकरणाचा आढावाही घेतला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लसीकरणासाठी वयोवृद्ध लोक येणार असून, त्यांना उन्हाचा त्रास होता कामा नये. लसीकरणाच्या ठिकाणी पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: Start Covid Care Center at Full Capacity: Sniffing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.