अग्निशमन सेवा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:09+5:302021-09-15T04:40:09+5:30

सिंदखेडराजा : फायर बंब असताना देखील शहरातील आगीच्या घटनांमध्ये होत असलेले नुकसान आपण टाळू शकत नाही़ त्यामुळे येथील ...

Start fire service, otherwise intense agitation | अग्निशमन सेवा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन

अग्निशमन सेवा सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन

Next

सिंदखेडराजा : फायर बंब असताना देखील शहरातील आगीच्या घटनांमध्ये होत असलेले नुकसान आपण टाळू शकत नाही़ त्यामुळे येथील अग्निशमन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी; अन्यथा पलिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाच्यावतीने पालिकेला देण्यात आला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री येथील एका कृषी साहित्याच्या दुकानाला आग लागली़ या आगीत जवळपास ५० लाख रुपयांचा माल जाळून खाक झाला. खासगी टँकर आणि जालना येथील फायर बांब बोलावून आग आटोक्यात आणली गेली. पालिकेकडे पाच वर्षांपासून फायर बंब आहे़ परंतु जागा बदलण्या पलीकडे या वाहनाचा कोणताच वापर झालेला नाही. याचसंदर्भात भाजपाच्या वतीने माजी नगराध्यक्ष विष्णू मेहेत्रे यांनी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून अग्निशमन सेवा तत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अग्निशमन वाहन कार्यान्वित असते तर जालना येथून वाहन बोलवावे लागले नसते आणि आगीत होणारे लाखो रुपयांचे नुकसान टाळता आले असते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अग्निशमन वाहन ठेवण्यासाठी जी इमारत पालिकेच्या ताब्यात आहे, ती विभागीय अधिकारी कार्यालयाला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याने फायर बंब मोकळ्या मैदानात ठेवण्यात आला आहे़ पाच वर्षांपासून हे वाहन नादुरुस्त आहे. तर दुसरीकडे यासाठी पुरेसा स्टाफ नाही. या सर्व बाबी तत्काळ पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी भाजपा शहराध्यक्ष कृष्णा काळे, सभापती कैलास मेहेत्रे, सोहम जयभाये, युवराज नागरे, ओम भुसारे, रामेश्वर घतोळकर, गजानन भुतेकर, बाळासाहेब केळकर यांनी उपस्थिती होती.

ती जागा परत घ्या

अग्निशमन वाहन ठेवण्यासाठी पालिकेकडे असलेली इमारत पालिकेने उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. सदर इमारत पालिकेने ताब्यात घेऊन तेथे अग्निशमन वाहन सुरक्षित ठेवावे, तसेच अग्निशमन सेवेसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची भरती करावी, अशी सूचना माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे यांनी आगीच्या घटनेनंतर पालिकेला केली आहे.

Web Title: Start fire service, otherwise intense agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.