मोठय़ा देवीच्या शांती उत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:04 AM2017-10-06T00:04:56+5:302017-10-06T00:05:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील मोठय़ा देवीच्या उत्सवास गुरुवार ५ ऑ क्टोबरपासून सुरुवात झाली. संपूर्ण देशामध्ये केवळ खामगाव येथे सार्जया होणार्या या उत्सवाची भक्तांना मोठी आतुरता लागून असते. आई राधा उदो उदोच्या गजरात खामगाव शहरा तून भव्य मिरवणूक काढून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
शहरात जगदंबा देवी ही मोठी देवी म्हणून प्रसिद्ध असून, या देवीचा उत्सव हा शांती उत्सव म्हणून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमे पासून ११ दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी हा उत्सव १२ दिवस साजरा होणार आहे. गुरुवारी घटस्थापना होऊन देवीच्या नवरात्री उत्सवास प्रारंभ करण्यात आला. शहरातील विविध ७१ जगदंबा उत्सव मंडळांकडूनसुद्धा जगदंबा देवीची स्थापना करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातसुद्धा जगदंबा देवीची स्था पना करण्यात आली आहे. यावेळी आई राधा उदो उदो च्या गजरात मिरवणूक काढून विविध मंडळांनी स्थापना केली. भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात केवळ खामगाव शहरातच हा उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवादरम्यान १३ ऑक्टोबर रोजी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर १४ ऑक्टोबरला विसर्जन होणार आहे. या उत्सवानिमित्त खामगाव शहरात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविक भक्त हजेरी लावणार असून, पुढील ११ दिवस शहर गजबजून जाणार आहे. या उ त्सवानिमित्त जगदंबा चौकासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.