गावागावात हायमास्ट लाइट बसविणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:09+5:302021-04-04T04:36:09+5:30
खा.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आ.संजय रायमुलकर यांनी गावागावात हायमास्ट लाइट बसविण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आ.संजय रायमुलकर ...
खा.प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आ.संजय रायमुलकर यांनी गावागावात हायमास्ट लाइट बसविण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आ.संजय रायमुलकर यांनी ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे योजनेंतर्गत शासनाकडे हायमास्ट बसविण्यात यावे, अशी मागणी केली होती. मेहकर व लोणार तालुक्यातील जवळपास १४० गावांत २ कोटी १५ लक्ष ५५ हजार रुपये खर्चून हायमास्ट लाइट बसविणे सुरू झाले आहे. या गावामध्ये मेहकर तालुक्यातील १०० व लोणार तालुक्यातील ४० गावांचा समावेश असून, यामध्ये मेहकरमधील खंडाळा, आरेगाव, अंजनी, अकोला ठाकरे, आंध्रुड, बोरी, बोथा, ब्रह्मपुरी, भालेगाव, बदनापूर, रत्नापूर, पोखरी, सावत्रा, गवंढाळा, नेमतापूर, बाभूळखेड, बरटाळा, बाऱ्हई, चिंचोली बोरे, चायगाव, दुधा, फरदापुर, घाटनांद्रा, गोमेधर, गजरखेड, गोहोगाव, गणपूर, घुटी, घाटबोरी, रायपूर, शिवपुरी, सोनारगव्हाण, साब्रा, थार, वरदडा, वागदेव, टेंबुरखेड, चिंचाळा, पाथर्डी, मेळजाणोरी, नागझरी, कोयाळी सास्ते, हिवरा खु., हिवरखेड, हिवरा साबळे, जवळा, जनुना, कंबरखेड, कनका, कळपविहीर, कल्याणा, कळमेश्वर, लावणा, लोणी गवळी, लव्हाळा, लोणी, मादणी, मांडवा डोंगर, मोहना खु., मोहना बु., मोळा, मिस्कीनवाडी, मोसंबेवाडी, मुंदेफळ, माळेगाव, मोळी, मारोतीपेठ, नायगाव दत्तापूर, नागापूर, नायगाव दे., पांगरखेड, पारखेड, परतापूर, पारडा, पेनटाकळी, पिंप्रीमाळी, पिंपळगाव उंडा, शहापूर, सारशिव, शेलगाव दे., सावंगीवीर, शिवाजी नगर, शेलगाव काकडे, शेंदला, सारंगपूर, उकळी, सुकळी, उमरा, उटी, उसरण, हिवरा आश्रम, मोहदरी, वरूड, विश्वी, वडगाव माळी, जयताळा, वरवंड, वडाळी, व.वैराळ तर लोणारमधील बोरखेडी, अंजनी, पांग्राडोळे, टिटवी, धाड, नांद्रा, रायगाव, सावरगाव मुंढे, गंधारी, शिवणी जाट, जांभूळ, पिंपळनेर, वेणी, गायखेड, पळसखेड, हिरडव, आरडव, दाभा, पहूर, कोलखेड, वढव, गुंधा, गुंजखेड, बागुलखेड, जाफराबाद, मोहतखेड, निजामपूर, मातरखेड, सरस्वती, पिंपळखुटा किन्ही, मातमळ, धायफळ, तांबोळा, अजिसपूर, खुरमपुर, दे.कुंडपाळ, पारडा दराडे, चिंचोली सांगळे, येवती, दे.वायसा आदी गावांचा समावेश आहे.