निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:33 PM2019-07-03T15:33:01+5:302019-07-03T15:33:30+5:30

खामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे.

Start of lodging water in the lower Gyan Ganga project | निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.
खामगाव मतदार संघातील बहुतांश भाग हा अवर्षण ग्रस्त म्हणून ओळखला जातो. हा डाग पुसून टाकण्यासाठी खामगांव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड आकाश फुंडकर यांनी प्रयत्न सुरु केले. निम्न ज्ञानगंगा प्रकल्प मागील अनेक वषार्पासून रखडला होता. हा प्रकल्प पुर्ण व्हावा हे दिवंगत लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी १६० कोटी रुपये मंजूर करुन घेतले होते. यामाध्यमातून याठिकाणच्या कुटूंबाच्या पुनर्वसनाचा तसेच शेतक-यांच्या जमीनीच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला होता. त्यातून नवीन नियमानुसार हया शेतक-यांना ४ ते ५ पट मोबदला देण्यात आला आहे. हया प्रकल्पामुळे ११८१ हेक्टर म्हणजेच जवळपास ३००० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यातून २२ ते २५ गावांना याचा फायदा होऊन सिंचनामुळे हजारो शेतकरी कुटूंबाच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थीक उन्नती होणार आहे. मागील तीन ते चार दशकानंतर हा पहिलाच प्रकल्प आहे. जो सततच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नामुळे पुर्णत्वास गेला आहे. लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे हे स्वप्न आज पुर्ण होत असून या प्रकल्पात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. सद्या मतदार संघात दमदार पाऊस झाला असून त्यामुळे हया प्रकल्पात जवळपास १ ते २ कि.मी पर्यंत पाणी साठलेले दिसत आहे. हया धरण क्षेत्रातील मोठ मोठी झाडे आता पाण्याखाली जात आहेत. हया प्रकल्पामुळे परिसरातील जमीनीतील पाणीसाठा वाढणार आहे. खामगांव परिसरात जवळपास तीन ते चार दशकानंतर हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यात आज मोठया प्रमाणात पाणी साठवणुक होऊन संपुर्ण परिसर जलमय होणार आहे. तसेच हयाठिकाणी बुलढाणा रस्त्यावरील जुना पुल लवकरच पाण्याखाली जाणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Start of lodging water in the lower Gyan Ganga project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.