‘नवे पर्व, नवी दिशा’ अभियानास प्रारंभ
By admin | Published: July 17, 2017 01:53 AM2017-07-17T01:53:40+5:302017-07-17T01:53:40+5:30
‘बेटी बचाओे’ची शेंदला येथे जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ, अभियानाचे नवे पर्व, नवी दिशा, नवे संकल्प मोहिमेस ११ जुलैपासून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार निकस यांच्या नेतृत्वात उपकेंद्र शेंदला येथे सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत दररोज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
२२ जून २०१५ पासून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रम सुरू केला असून, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी सदर कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. जिल्हाधिकारी पुलकुंडवार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन यांनीदेखील ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीची सुरुवात केली. त्या अनुषंगाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ, नवे पर्व नवी दिशा’ नवे संकल्प अभियान ११ जुलै ते २६ जुलैदरम्यान जिल्हाभर राबविल्या जाणार आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार निकस यांच्या नेतृत्वात उपकेंद्र शेंदला येथे झाली. सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. निकस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीच्या पत्राचे वाचन केले.