बुलडाण्यात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रक्रियेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 04:13 PM2020-01-24T16:13:03+5:302020-01-24T16:13:03+5:30
बुलडाणा शहरात दररोज १० मॅट्रीक्स टन कचरा निघतो. हा कचरा पालिकेच्या वाहनाने शहराबाहेर हनवतखेड गावानजीक असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. कचºयापासून खतनिर्मिती करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने प्राथमिक स्तरावर आवश्यक असलेले यंत्र गुरुवारी शहरात दाखल झाले आहे. या यंत्राद्वारे कचरा बारीक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर आणखी प्रक्रिया करून त्याचे खतात रूपांतर करण्यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कचरा डेपोमुळे हनवतखेडवासीयांना होत असलेला त्रास आता काहीअंशी कमी होणार आहे.
बुलडाणा शहरात दररोज १० मॅट्रीक्स टन कचरा निघतो. हा कचरा पालिकेच्या वाहनाने शहराबाहेर हनवतखेड गावानजीक असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. ही जागा मर्यादीत असल्याने या जागेवर कचºयाचे मोठमोठे ढिगारे साचले आहेत. नवीन कचरा टाकताना तो नेमका कुठे टाकावा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडतो. एवढेच नव्हे हा मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. यामुळे येथून जवळच असलेल्या हनवतखेड येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींबर तोडगा म्हणून पालिकेच्या वतीने या कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होताना दिसत आहे. केवळ या कचºयाची विल्हेवाट लावणे एवढाच उद्देश नसून त्याचा योग्य विनियोग करण्याबाबतही नियोजन पूर्ण झाली आहे.
शहरात गुरुवारी कचºयापासून खतनिर्मितीसाठी मशिन कार्यान्वीत करण्यात आली आहे. या मशीनची क्षमता ३५० टीपीएस एवढी आहे. या माध्यमातून डंपींग ग्राऊंडमध्ये साठलेल्या कचºयाची लवकरात लवकर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. सध्या कचरा बारीक करण्यास सुरुवात झाली असून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणखी यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे. याकरीता शासनाकडून वाढीव निधी मिळविण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नरत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचºयाची योग्य विल्हेवाट लावणे हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. बुलडाणा पालिकेकडून या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आल्याने शहराच्या स्वच्छतेतदेखील या माध्यमातून विशेष भर पडणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत.
ठराविक अंतरावर हव्या कचरा कुंड्या
घरातील कचरा शहराबाहेर टाकण्यासाठी शहरात घंटागाड्यांची व्यवस्था आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक परिसरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी उपायोजना पालिकेच्या वतीने करण्यात येत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर पडलेला दिसून येतो. हा कचरा एकत्रिपणे गोळा करण्यासाठी पालिकेने ठराविक अंतरावर कचराकुंड्या लावणे गरजेचे आहे. या कचराकुंड्या लावल्यानंतर नागरिकांनी देखील आपली जबाबदारी म्हणून कचरा हा कचराकुंडीतच टाकणे अपेक्षित आहे.