नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा!
By Admin | Published: August 31, 2016 01:26 AM2016-08-31T01:26:43+5:302016-08-31T01:26:43+5:30
चिखली येथे शिवसेनेची मागणी.
चिखली(जि. बुलडाणा), दि. ३0: सातत्याने तीन वर्षे दुष्काळ व अत्यल्प उत् पन्नामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. निसर्गाच्या कृपेने यंदा समाधानकारक पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असून, पिके काढणीवर आली आहेत; मात्र ऐनवेळी शेतमाल बाजारात दाखल होताना दरामध्ये घसरण झाल्यास शेतकर्यांची एकप्रकारे फसवणूक होण्याची शक्यता पाहता खरीप हंगामातील शे तमाल बाजारात दाखल होण्यापूर्वी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दीपक बाहेकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. चिखली तहसीलदारांमार्फत देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सातत्याने येणार्या दुष्काळामुळे शेतीतून उत्पादन खर्च भरून निघेल इ तके उत्पन्न झाले नाही. त्यामुळे मूग, उडीद, तुरीच्या भावात वाढ झालेली आहे. दरम्यान, डाळी वाणाची मागणी लक्षात घेता सरकारने शेतकर्यांना डाळवर्गीय िपकांची लागवड करण्याचे आवाहन केले होते. तर सध्या बाजारात डाळींच्या वाढलेल्या भावामुळे डाळवर्गीय पिकांना चांगला भाव मिळेल, या आशेने यंदा शे तकर्यांना मोठय़ा प्रमाणावर तूर, मूग, उडिदाची लागवड केली आहे. गतवर्षी मुगाचे भाव ७ ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल, उडीद ८ ते १३ हजार तर तूर ९ ते ११ हजार रुपये प्रति क्विंटल होता; मात्र गतवर्षी इतके उत्पन्नच झाले नसल्याने शेतकर्यांना फारसा लाभ झाला नाही; मात्र सध्याची मागणी लक्षात घेता शेतकर्यांना यावर्षी डाळ वर्गीय पिकांतून चांगले उत्पन्न अपेक्षीत असून, पोळय़ानंतर बहुतांश शे तकर्यांच्या घरात उडीद, मूग येणार आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने तसेच व्या पार्यांनी मोठय़ा प्रमाणावर विदेशातून मूग, उडीद व तुरीच्या डाळींची आयात केल्यामुळे ऐनवेळी व्यापार्यांकडून या डाळवर्गीय शेतमालाचे भाव पाडून पुन्हा शे तकर्यांना नागविण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने याकडे ता तडीने लक्ष घालून शेतकर्यांच्या शेतमालाची उत्पादन खर्चाचा हिशेब करता, त्यावर ५0 टक्के नफा जोडून शेतकर्यांचा माल बाजारात येण्याआधी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करावे, अशी आग्रही मागणी दीपक बाहेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देतेवेळी उपजिल्हाप्रमुख डॉ.राजपूत, शिवाजी देशमुख, मनोहर शिंदे, गजानन पवार, सिध्दूसिंग राजपूत, भगवान वाळेकर, अनिल बाहेकर, राजेंद्र चाकोतकर, सुनील बाहेकर, राजेंद्र बाहेकर आदींची उपस्थिती होती.