राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक वेतनवाढीपासून वंचित

By admin | Published: September 11, 2014 12:31 AM2014-09-11T00:31:41+5:302014-09-11T00:31:41+5:30

शासनाची टाळाटाळ: आदेश न काढल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर.

State award-winning teachers are deprived of wages | राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक वेतनवाढीपासून वंचित

राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक वेतनवाढीपासून वंचित

Next

जळगाव : राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना यावर्षीपासून पुरस्काराची रक्कम १ लाख रुपये देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले असले तरी, पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वे तनवाढींचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक शासन आदेश काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने शिक्षक वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी २00५ पर्यंत व्यवस्थित झाली. २00६ साली सहावे वेतन आयोग लागू झाले. या आयोगानुसार अशाप्रकारे आगाऊ वेतनवाढी देण्याची तरतुद नसल्याने, त्यासाठी राज्य शासनाकडून वेगळा आदेश काढण्याची गरज होती. सहाव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी २00९ साली झाली. तो पर्यंत राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मिळाल्या; परंतु सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर या वेतनवाढींची त्यांच्याकडून वसुली झाली. त्यामुळे प्रत्यक्षात २00६ पासून राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक आगाऊ वेतनवाढीपासून वंचित झाले. यामुळे शिक्षकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: State award-winning teachers are deprived of wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.