चिखली उपक्रमशील शिक्षिका ऊर्मिला शेळके यांना राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:05+5:302021-02-13T04:34:05+5:30
हा पुरस्कार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला. संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना महामारीमुळे जग थांबले होते; पण ...
हा पुरस्कार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला. संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना महामारीमुळे जग थांबले होते; पण या काळात घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळाअंतर्गत 'टूपी लाइव्ह एज्युकेशन' या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावीत यासाठी 'युट्यूब'द्वारे रोज शैक्षणिक पाठाचे उत्कृष्ट 'लाइव्ह' सादरीकरण केले जात होते. यामध्ये राज्यातील अनेक शिक्षकांनी भाग घेतला होता. त्यात चिखली तालुक्यातून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा वरखेड येथे कार्यरत उपक्रमशील शिक्षिका ऊर्मिला साहेबराव शेळके यांनी सुद्धा इयत्ता १ ते पाचवीपर्यंतच्या अनेक पाठांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. याची दखल घेत तापडिया नाट्य मंदिर औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री बच्चू कडू, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्या हस्ते ऊर्मिला शेळके यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.