राज्यस्तरीय लोणार विज्ञान महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:22+5:302021-02-27T04:46:22+5:30
या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिन व लोणार सरोवराचे संवर्धन या उद्देशाने केले होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश ...
या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिन व लोणार सरोवराचे संवर्धन या उद्देशाने केले होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी केले तसेच या महोत्सवाच्या आयोजनमागचा उद्देश स्पष्ट केला. तसेच कोविड परिस्थितीमुळे हा महोत्सव ऑनलाईन घेतल्याचे सांगितले.
महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. संजय ढोले (सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ) म्हणाले की, लोणार सरोवरमध्ये अजून संशोधन होणे आवश्यक आहे. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आपले योगदान आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विज्ञानातील क्षितिजे या विषयावर आपले विचार मांडले. यानंतर डॉ.काकासाहेब मोहिते (प्राचार्य सी. टी. बोरा महाविद्यालय शिरुर व माजी सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ) यांनी विज्ञानयुगातील सुवर्ण दशक यावर भाष्य करताना, या कालावधीत लागलेल्या महत्त्वाच्या शोधाबद्दल माहिती सादर केली. डॉ. पंडित विद्यासागर यांनी हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आशावाद व्यक्त केला. तसेच विज्ञान- तंत्रज्ञानाचा विकास करताना पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. या महोत्सवाअंतर्गत चित्रकला, रांगोळी स्पर्धा (विषय -आपल्या कल्पनेतील लोणार सरोवर) निबंध स्पर्धा (विषय- लोणार सरोवराचा विकास आराखडा) आयोजित केला होता. त्यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या महोत्सवाचे समन्वयक प्रा. कमलाकर वाव्हळ यांनी आभार मानले तर . सौरभ प. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख अतिथींची ओळख प्रा. डॉ. सूर्यकांत बोरूळ व प्रा. डॉ. महेंद्र भिसे यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.