राज्यस्तरीय ग्रामीण धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा
By Admin | Updated: December 11, 2014 01:21 IST2014-12-11T01:21:37+5:302014-12-11T01:21:37+5:30
बुलडाणा येथे १४ ते १५ डिसेंबर रोजी आयोजन.

राज्यस्तरीय ग्रामीण धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा
बुलडाणा : राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत राज्यस्तरीय ग्रामीन धनुर्विद्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन शहरातील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे १४ ते १५ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. अशी माहिती १0 डिसेंबर रोजी जिजामाता क्रीडा संकुल येथे आयोजित पत्रपरिषदेत जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली. राज्यातील नऊ संघांतून एकून ७२ खेळाडू मुलमुली, ४0 व्यवस्थापक १५ पंच अधिकारी, तीन निवड समिती सदस्य आणि १५ क्रीडा कार्यकर्ते या स्पर्धेत सहभागी होणार आहे. १५ डिसेंबर रोजी स्थानिक जिजामाता क्रिडा व व्यापारी संकुल येथे स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अलकाताई खंदारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, क्रीडा व युवक सेवा, अमरावती येथील उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अँड. राजेश लहाने, संघटनेचे सचिव मनोज व्यवहारे आदी उपस्थित राहणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण तसेच समारोप सोहळा १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रभारी जिल्हाधिकारी जोशी, जिल्हा पोलिस अधिक्षक शाम दिघावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, यांच्या उपस्थितीत होईल.