तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 03:05 PM2019-02-23T15:05:29+5:302019-02-23T15:06:00+5:30

शेगाव : महाराष्ट्र राज्य तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील श्री संत गजानन महाराज इंजिनियरींग कॉलेजचे प्रशस्त सभागृहात पार पडले.

State-level session of the nayab tehsildar organization | तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : महाराष्ट्र राज्य तहसीलदार  - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील श्री संत गजानन महाराज इंजिनियरींग कॉलेजचे प्रशस्त सभागृहात पार पडले. यावेळी एकसंघ होवून समस्यांवर मात करुया असा संकल्प करण्यात आला. 
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे बुलडाणा, मोहन जोशी  अजय लहाने अकोला, कोकण विभाग अध्यक्ष आर.जे.पाटील, प्रा. संजय खडसे जळगाव जा., पुणे विभाग डि.एस. कुंभार, विभागीय संघटक पंकज पवार नाशिक,किरण आंबेकर औरंगाबाद, मोहन टिकले नागपूर, प्रविण ठाकरे अमरावती, समाधान सोळंके अकोला, संजय गरकळ, नंदकिशोर  बुटे, सोहम वायाळ, मनोज दांडगे, अजय पिंपरकर, विजय टेकाडे  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
 प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून संत गजानन महाराज, मॉ जिजाऊ, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तसेच शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तदनंतर प्रास्ताविकात संजय खडसे यांनी संघटनेचे ध्येय धोरण स्पष्ट केले. यावेळी राजस्व दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन ही करण्यात आले. 
अधिवेशनात तहसीलदार रामेश्वर पुरी, दिनेश गिते, शिल्पा बोबडे, स्वप्नाली डोईफोडे, माटोडे,डॉ सागर भागवत,आदीसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदार, तसेच महसुल, पटवारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. 

समस्या सोडविण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन 
महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधून समस्या पुर्ततेची ग्वाही दिली. याशिवाय जिल्हयाचे पालकमंत्री मदन येरावार यांनीही शुभेच्छा संदेश पाठविला.

Web Title: State-level session of the nayab tehsildar organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.