बुलडाण्यात राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 06:41 PM2019-08-03T18:41:35+5:302019-08-03T18:42:04+5:30

बुलडाणा : संयमी, सुसंस्कृत, निरहंकारी मूल्याधिष्ठीत विद्यार्थी घडविण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देवद्वारा ११  आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

State Level Shrimad Bhagavad Gita Knowledge Competition Exam | बुलडाण्यात राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा

बुलडाण्यात राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा

Next

बुलडाणा : संयमी, सुसंस्कृत, निरहंकारी मूल्याधिष्ठीत विद्यार्थी घडविण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देवद्वारा ११  आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गोकुळ अष्टमी महापर्वानिमित्त आयोजित या परिक्षेमध्ये राज्यातील हजारो विद्यार्थी सहभाग घेणार आहेत.
ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात संशोधनासाठी गीतेसारखा उपयुक्त असा दुसार ग्रंथच नाही. भारताची अखंडता, पवित्रता व सांस्कृतीक अभिवृद्धीसाठी या ग्रंथाचे समाज मुल्य आकलन होणे महत्त्वाचे आहे. श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने गोपाल आश्रमाच्या माध्यमातून आचार्य लोणारकर बाबा मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा घेण्यात येते.  यापूर्वी ही ज्ञान स्पर्धा श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे घेण्यात येत होती. त्यानंतर मागील काही वर्षांपासून बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील गोपाल आश्रमातील पंचकृष्ण मंदिर परिसरात घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी, तरुणांनी अध्यात्मासोबत विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात केले आहे. ही परीक्षा देणाºया अभ्यासकास गीतेच्या माध्यमातून काम-क्रोधावर नियंत्रण ठेवून मन एकाग्र करता येते. तसेच ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनासाठी या परीक्षेचा उपयोग होत आहे. या परीक्षेसाठी तसेच आश्रमातील विविध शिबिराच्या माध्यमातून आजही आचार्य श्री लोणारकर मोठे बाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सत्य, अहिंसा, आदरभाव, भूतदया, कार्यदक्षता, मानवता, श्रीमद् भगवद् गीता तत्त्वज्ञान, आरोग्य, ज्ञान-विज्ञान या विषयावर ज्ञान देण्यात येते. यावर्षी ११ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा होणार आहे. ही परीक्षा मराठी माध्यमातून सुलभ मराठी सिद्धांतार्थ गीता ग्रंथावर सोप्या वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धेत सहभाग घेणाºया स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. 
 
१ सप्टेंबरला बक्षीस वितरण
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव व्दारा बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील श्री गोपाल आश्रम येथे आयोजित  करण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्रीमद् भगवद गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण १ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांबरोबच नागरिकांसाठी खुल्या स्वरूपाची आहे. 
 
आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग
महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने गोपाल आश्रमाच्या माध्यमातून आचार्य लोणारकर बाबा मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९३ पासून गोकूळ अष्टमीच्या महापर्वानिमित्त राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला असून, दरवर्षी जवळपास २५ हजार स्पर्धक परीक्षेसाठी नोंदणी करीत आहेत.

Web Title: State Level Shrimad Bhagavad Gita Knowledge Competition Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.