रौप्यमहोत्सवी परंपरा असलेली राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:02 PM2018-07-21T14:02:44+5:302018-07-21T14:04:41+5:30

बुलडाणा : श्रीमद भगवतगीतेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती होण्यासाठी अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव व्दारा १९ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

The state-level Srimad Bhagwatgita KnowledgeTraining Examination | रौप्यमहोत्सवी परंपरा असलेली राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षा 

रौप्यमहोत्सवी परंपरा असलेली राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षा 

Next
ठळक मुद्देसदर परीक्षेला रौप्य महोत्सवाची परंपरा असून दरवर्षी राज्यातील हजारो शाळा, महाविद्यालयीन विद्याथी सहभागी होतात.१९९३ पासून गोकुळ अष्टमीच्या महापर्वानिमित्त राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षा घेण्यात येते. यावर्षी १९ आॅगस्ट २०१८ रोजी राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षा होणार आहे.

 - हर्षनंदन वाघ

बुलडाणा : श्रीमद भगवतगीतेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती होण्यासाठी अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव व्दारा १९ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेला रौप्य महोत्सवाची परंपरा असून दरवर्षी राज्यातील हजारो शाळा, महाविद्यालयीन विद्याथी सहभागी होतात. महानुभाव पंथीयांचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र जाळीचा देव येथे भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने गोपाल आश्रमाच्या माध्यमातून आचार्य श्री लोणारकर बाबा मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९३ पासून गोकुळ अष्टमीच्या महापर्वानिमित्त राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत आतापर्यंत ५ लाखापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला असून दरवर्षी जवळपास २५ हजार स्पर्धक परीक्षेसाठी नोंदणी करीत आहेत. यापूर्वी सदर ज्ञान स्पर्धा श्री क्षेत्र जाळीचा देव येथे घेण्यात येत होती. त्यानंतर मागिल १५ वर्षापासून बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील गोपाल आश्रमातील पंचकृष्ण मंदिर परिसरात घेण्यात येत आहे. एकूण २५ वर्षाचा कार्यकाळात या परीक्षेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातील विद्यार्थी, तरूणांनी अध्यात्मासोबत विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात केले आहे. सदर परीक्षा देणाºया अभ्यासकास गीतेच्या माध्यमातून काम क्रोधावर नियंत्रण ठेवून मन एकाग्र करता येते. तसेच ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनासाठी या परीक्षेचा उपयोग होत आहे. या परीक्षेसाठी तसेच आश्रमातील विविध शिबिराच्या माध्यमातून आजही आचार्य श्री लोणारकर मोठे बाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, सत्य, शाकाहार, अहिंसा, आदरभाव, भूतदया, कार्यदक्षता, मानवता, श्रीमद्भगवगीता तत्वज्ञान, आरोग्य, ज्ञान-विज्ञान या विषयावर ज्ञान देण्यात येते. यावर्षी १९ आॅगस्ट २०१८ रोजी राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षा होणार असून बक्षीस वितरण १२ सप्टेंबर २०१८ रोजी करण्यात येणार आहे. सदर परीक्ष मराठी माध्यमातून सुलभ मराठी सिध्दांतार्थ गीता ग्रंथावर सोप्या वस्तुनिष्ठ पध्दतीने घेण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धेत सहभाग घेणाºया स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, तरूणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव यांनी केले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त देवपूजा कार्यक्रम

अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव व्दारा बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील श्री गोपाल आश्रम येथे आषाढी एकादशीनिमित्त देवपूजा व प्रसाद वंदनाचा कार्यक्रम २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये आचार्य लोणारकर पिढीचे मुख्य कुळवंदन पोफळ फोडना, श्री चक्रधर स्वामींचा अडकित्ता व इतरही देवपूजा व प्रसाद वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील महानुभावपंथी हजारों भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेव्दारे श्री गोपाल आश्रम परिसरात घेण्यात येणाºया राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा व देवपूजा कार्यक्रमात अध्यात्मासह समाजातील चांगला व्यक्ती घडविण्याच्या दृष्टीकोनातून ज्ञान देण्यात येत असून आजपर्यंत हजारो स्पर्धक व भाविकांनी लाभ घेतला आहे.

-आचार्य लोणारकर मोठे बाबा, गोपाल आश्रम, अजिंठा रस्ता, बुलडाणा.

Web Title: The state-level Srimad Bhagwatgita KnowledgeTraining Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.