ग्रंथदिंडीने राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:59 PM2019-01-20T12:59:06+5:302019-01-20T12:59:21+5:30
खामगाव : सृष्टी बहुउद्देशिय युवा संस्था व तरुणाई फाउंडेशन खामगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया राज्य स्तरीय युवा साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने सुरूवात झाली.
- अनिल गवई
खामगाव : सृष्टी बहुउद्देशिय युवा संस्था व तरुणाई फाउंडेशन खामगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया राज्य स्तरीय युवा साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील ख्यातनाम आणि युवा साहित्यिक खामगावात दाखल झालेत.
रविवारी सकाळी ९ वाजता संमेलनाध्यक्ष नवनाथ गोरे आणि युवा अभिनेता राजकुमार तांगडे, ज्येष्ठ साहित्यिक रामदादा मोहिते, स्वागताध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण, तरुणाईचे संस्थापक मनजीतसिंह शीख, अध्यक्ष नारायण पिठोरे, सचिव राजेंद्र कोल्हे, संयोजक अरविंद शिंगाडे, संतोष इंगळे, अजय माटे, अविनाश सोनटक्के, उमाकांत कांडेकर यांच्यासह मान्यवर आणि युवा साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर गं्रडदिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीत अग्रभागी कॉलेज आॅफ मॅनेजमेंटचे ढोल पथकानंतर स्वच्छतेचा संदेश देणाºया गाडगेबाबांची जीवंत झांकी होती. तसेच शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीच्या राणीची वेषभूषा केलेल्या कलावंतांनी गं्रथदिंडीची शोभा वाढविली. मंगलकलशधारी चिमुकल्या तसेच सुवासिनी, लेझीम पथक, वारकरी आणि पालखी या दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. शहराच्या विविध मार्गक्रमण केल्यानंतर कोल्हटकर स्मारक मंदिरात या ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला.
गाडगेबाबांनी दिला स्वच्छतेचा संदेश
ग्रंथदिंडीत गाडगेबाबांची वेषभूषा करणारे गजानन छबीले सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. त्यांनी हातात खराटा घेत, शहरातील रस्त्यांची शोभा वाढविली. या दिंडीत महात्मा गांधी- दर्शन कांबळे, महात्मा फुले- हेमंत दाते- सुभाषचंद्र बोस- राम निंबाळकर, एपीजे अब्दुल कलाम- अमोल चव्हाण, संत तुकाराम महाराज- श्रेयस अढाव, पंडित जवाहरलाल नेहरू- हर्ष अढाव, भारत माता- दिपीका राऊत अशा भूमिका अदा केल्या. तर अश्वावर स्वार असलेल्या शिवाजी महाराजांची भूमिका यश आवारकर, महाराणा प्रताप- रुद्राक्ष कोकणे, झाशीची राणी- रुपाली धुरंधर यांनी केली.