राज्यात तुरीला मिळणार ४७00 प्रतिक्विंटल भाव !
By Admin | Updated: December 11, 2014 00:07 IST2014-12-10T23:57:40+5:302014-12-11T00:07:56+5:30
केंद्रीय कृषीमाल पणन केंद्राचा अंदाज.

राज्यात तुरीला मिळणार ४७00 प्रतिक्विंटल भाव !
अकोला : तूरीला राज्यात प्रतिक्विंटल ४६00 ते ४७00 रू पये भाव मिळण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाच्या कृषीमाल विपणन केंद्राने वर्तविली आहे. भारतात तूर या कडधान्य पिकाचे सर्वाधिक क्षेत्र हे या राज्यात असून, गतवर्षी ९३.२0 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती; तथापि यावर्षी पावसाला विलंब झाल्याने तुरीचे क्षेत्र घटून, ते ८३.२४ लाख हेक्टरपर्यत खाली आले आहे. तूर पीक कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. यावर्षी या पिकाचे उत्पादन २.७४ लाख टन अपेक्षित आहे. या राज्यातील तूर कडधान्यातील प्रमुख पीक असल्याने, जळगाव, लातूर, औरंगाबाद, मुंबई, अकोला, नागपूर आदी जिल्हे तूर खरेदी विक्रीचे प्रमुख व्यापार केंद्र आहेत. यावर्षी उत्पादन कमी होण्याचे संकेत असल्याने शेतकर्यांना तुरीच्या भविष्यातील किंमतीची प्रतिक्षा आहे. याच पृष्ठभूमीवर या कृषी विद्यापीठातील एनकॅप (एनसीएपी) नवी दिल्ली, कृषी विपणन केंद्राचे कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र देशमुख, सहाय्यक प्रकल्प प्रमुख डॉ. वनिता खोबरकर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक गजानन नागे, विजय बोदडे यांनी लातूर बाजारातील मागील १४ वर्षाच्या कालावधीतील मासीक सरासरी किंमतीचे पृथक्करण केले. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार बाजारपेठेतील चालू किं मती कायम राहिल्यास डीसेंबर महिन्यात तुरीची सरासरी किंमत प्रतिक्विंटल ४६00 ते ४७00 रू पये राहण्याची शक्यता आहे. आयात निर्यात धोरणात आणि हवामानात काही बदल झाल्यास त्याचा तुरीच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता या शेतमाल विपणन केंद्राने व्यक्त केली आहे. यावर्षी चालू महिन्यात तुरीचे प्रतिक्विंटल दर ४६00 ते ४७00 रू पये राहण्याची शक्यता आहे. आयात निर्यात धोरण आणि हवामानात काही बदल झाल्यास या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विक्री व साठवणुकीसाठी शेतकर्यांना ही माहिती दिली असल्याचे पंदेकृविच्या कृषी विपणण प्रकल्पाचे प्रमुख डॉ.राजेंद्र देशमुख यांनी सांगीतले.